हडपसर (पुणे) येथे रिक्शामधून गोवंशियांच्या मांसाची वाहतूक, एकाच वेळेस २ ठिकाणी कारवाई !
हडपसर (जिल्हा पुणे) – इंदापूर येथून ७ जानेवारी या दिवशी रिक्शातून कोंढवा सय्यदनगर येथे गोमांस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हडपसर येथे रिक्शा पकडली असता रिक्शामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोमांस आढळले. त्यामध्ये गाय आणि बैल यांची मुंडकी, धड, पाय आणि कातडी काढलेल्या अवस्थेत धड, तसेच मांस दिसले. पशूवैद्यकीय अधिकार्यांच्या वतीने मांसाचे नमुने काढून सर्व मांस नष्ट करण्यात आले आहे. या कारवाईत रिक्शा जप्त करून दोघांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. (राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही अधून मधून मोठ्या प्रमाणात गोवंशियांचे मांस मिळणे, हे संतापजनक आणि प्रशासनासाठी गंभीर आहे. – संपादक)
दुसर्या एका घटनेतही एका रिक्शामधून २ टन गोमांस घेऊन ‘गरीब नवाज बिप शॉप’ रामटेकडी, वानवडी (पुणे) या दुकानात विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांच्या साहाय्याने दुकानावर धाड टाकली असता दुकानामध्ये गाय, बैल आणि वासरू यांचे मुंडके, पाय, धड, असे विक्री करतांना दिसले आणि काही गोवंशियांचे मांस हे ‘डिप फ्रीज’मध्ये ठेवलेले सापडले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद केला असून पशूवैद्यकीय अधिकार्यांच्या वतीने सर्व मांस नष्ट करण्यात आले आहे, तसेच हे दुकान बंद केले आहे. हे अवैध गोमांस दुकान रामटेकडी येथील विठ्ठल मंदिरासमोर होते. (अवैधरित्या गोवंशियांची हत्या करून धर्मांध गोवंशियांचे मांस खुलेआम मंदिरासमोर विकण्याचे धारिष्ट्य करतात, हे लज्जास्पद आहे ! हिंदुत्वनिष्ठांनी गोमांस पकडून दिल्यावर केवळ वाहनचालक आणि वाहन यांवर कारवाई करण्यात येते. त्याऐवजी मूळ सूत्रधारावरच पोलिसांनी कडक कारवाई करून गोहत्या रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. – संपादक)