…हिंदु मुलीचा मुसलमान मुलाशी सार्वजनिक विवाह करण्यामागचा हेतू काय ?
हिंदु मुलीचा विवाह धर्मांध मुलाशी करवून देणे, हा प्रकार आत्मघाती ठरल्यास आश्चर्य ते काय ? – संपादक
नाशिक येथील एका श्रीमंत सराफ व्यावसायिकांची मुलगी रसिका हिचा विवाह मुसलमान युवक आसिफ याच्याशी झाला. ‘हा विवाह लव्ह जिहाद आहे किंवा नाही’ हे कालांतराने कळेल; तरीही या विवाहाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’चा विषय चर्चेत आला. ‘लव्ह जिहाद’ या विषयाची व्याप्ती आणि विविध पैलू लक्षात आणून देणारी ही लेखमालिका ‘असे विवाह म्हणजे एक प्रकारे हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न कसा आहे ?’, हे लक्षात आणून देईल !
मागील भागात आपण केरळ आणि कर्नाटक राज्यांतील लव्ह जिहादची भयावहता, पाताळयंत्री धर्मांध आणि मुसलमान मुलीने हिंदु मुलाशी प्रेमसंबंध लक्षात आल्यावर तथाकथित धर्मनिरपेक्षवाल्यांची भूमिका आदी सूत्रे पाहिली. त्यापुढील सूत्रे आज पाहू.
(भाग ३)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/543270.html
लेखक – शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ
रुढीबद्ध आणि फतव्यांचे पालन करणार्या मुसलमान समाजात रसिका तिचे हिंदुत्व किती काळ टिकवू शकेल ?
नाशिक येथील प्रकरणात रसिकाच्या कुटुंबियांसमवेत बसून दूरदर्शनवर वार्तालाप (मुलाखत) करतांना असिफने म्हटले, ‘‘विवाहानंतर रसिकाला हिंदु धर्मानुसार सण साजरे करता येतील, देवी-देवतांची पूजा करता येईल.’’ हिंदु मुलींशी विवाह करणारे मुसलमान तरुण आरंभी असेच म्हणतात; पण विवाहानंतर अनेक वेळा तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला जातो, तर काही वेळा घरातील आणि समाजातील वातावरणामुळे तिला स्वधर्मानुसार सण साजरे करणे किंवा त्यात सहभागी होणे अशक्य होते. मुसलमान समाज हा रुढीबद्ध आणि कुराणाचे तंतोतंत पालन करणारा आहे. तसेच पालटत्या परिस्थितीनुसार ‘मुसलमान समाजाने कोणत्या प्रसंगी कसे वागायचे ?’ याचे निर्देश देणारे ‘फतवे’ सातत्याने निघत असतात. देवबंदने वर्ष २०१२ मध्ये एक फतवा काढला होता. त्यात म्हटले होते, ‘इस्लामनुसार मुसलमान पुरुषाला अन्य धर्मीय मुलींशी प्रेम किंवा मैत्री करण्याची अनुमती नाही; कारण असे विवाह फार काळ टिकत नाहीत. जर अन्य धर्मीय मुलीने इस्लामचा स्वीकार (कबूल) करून इस्लामी पद्धतीने निकाह केला, तरच ते योग्य आहे. मुसलमानांना इतर धर्मीय पद्धतीने विवाह करण्याची अनुमती नाही. इस्लाम स्वीकारल्यानंतर विवाहाची केवळ इस्लामी पद्धतच योग्य आहे.’ या आदेशाच्या (फतवा) अनुषंगाने रसिका तिचे हिंदुत्व किती दिवस टिकवू शकेल, हा प्रश्नच आहे.
अभिनेता सैफ अली खानशी विवाह करतांना करीना कपूरनेसुद्धा ‘‘मी धर्म पालटणार नाही’’, अशा वल्गना केल्या होत्या. करीनाची सासू आयेशा बेगम (शर्मिला टागोर) यांनी म्हटले होते, ‘‘करीना हिंदूच आहे; पण तिला आता माझा मुलगा सैफ अली खानची ‘बेगम’ मानले जाईल.’’ याचा अर्थ काय समजायचा ? करीनाने अद्याप ‘इस्लाम’ स्वीकारलाही नसेल कदाचित्; पण ती तिच्या मुलाचे नाव हिंदु पद्धतीने ठेवू शकली नाही. करीना ही हिंदु असली, तरी तिच्या अपत्याला रुढीप्रमाणे पित्याचाच धर्म मिळाला आहे; म्हणूनच मुलाचे नाव ‘तैमूर’ असे ठेवले आहे.
क्रूरकर्मा तैमूरच्या काळ्या इतिहासाला उजाळा देण्याचे काम केले !
उझबेकिस्तानात जन्मलेला पायाने लंगडा ‘तैमूरलंग’ क्रूरतेमुळे जगात कुख्यात होता. वर्ष १३९८ मध्ये त्याने भारतावर आक्रमण केले आणि हिंदु प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. तो शत्रूचे मुंडके छाटून त्याचे मनोरे रचत असे. देहलीमध्ये तर त्याने प्रेतांचा एवढा खच पाडला होता की, लोकांना रस्त्याने चालणे कठीण झाले होते. पुढे याच्या आणि चंगीजखानाच्या सोयरसंबंधातून मोगल वंशाची निर्मिती झाली. बाबर हा या वंशाचा संस्थापक. बाबरापासून ते औरंगजेबापर्यंत सार्याच मोगल आक्रमकांचा (राजांचा) इतिहास हिंदु स्त्री-पुरुषांवरील अत्याचाराने रक्तरंजित असा आहे. त्यामुळे त्याच्या मुलाचे नाव ‘तैमूर’ ठेवून सैफ आणि करीनाने काळ्या इतिहासाला उजाळा देण्यामागचे कारण काय असावे, हे समजत नाही.
असिफने म्हटल्याप्रमाणे रसिका खरोखर हिंदु धर्माचे पालन करू शकेल का ?
सैफ अली खानने करीनाशी विवाह करतांना जसे करीनाच्या हिंदुत्वाविषयी आश्वासन दिले होते, तसेच असिफनेही रसिकाला दिले आहे. यामुळे माझ्या मनात अनेक प्रश्नांचे वादळ उठले आहे. आसिफ आणि रसिका यांच्या अपत्याचा धर्म कोणता राहील ? त्यांची नावे हिंदु असतील कि
मुसलमान ? ती मंदिरात जातील का ? रसिका तिच्या घरात खरोखरच हिंदु देवतांच्या मूर्ती ठेवून त्यांची पूजा करू शकेल का ? इस्लाम धर्मात मूर्तीपूजा आणि अल्लाविना इतर देव निषिद्ध मानले जातात. त्यामुळे मूर्तीपूजा करणे, हा धार्मिक अपराध मानला जातो; म्हणून हा प्रश्न. हिंदु धर्मात प्रत्येक मासात अनेक सण येतात. इतर सण जाऊ द्या; पण दीपावली, दसरा, गणेशोत्सव, रंगपंचमी असे मुख्य सण, तरी रसिका साजरे करू शकेल काय ? रसिकाला यापुढे गंगामाता, गोमाता आणि गीता यांविषयी पूर्वीसारखाच पूज्य भाव वाटेल काय ? ती आपल्या अपत्यांना हिंदु सणांची महती शिकवू शकेल काय ?
असिफ आणि रसिका यांचा सार्वजनिक विवाह करण्याचा हेतू काय ?
असिफ आणि रसिकाचा २१ मे २०२१ या दिवशी नोंदणी पद्धतीने विवाह झाला होता. मग पुन्हा पत्रिका छापून हिंदु पद्धतीने सार्वजनिकरीत्या विवाह साजरा करण्याचे काय कारण ? ही अभिनव कल्पना कोणाची ? ‘अशा आंतरधर्मीय विवाहाला हिंदु समाजही आनंदाने उपस्थित राहून संमती देतो’, असे जगाला दाखवून द्यायचे होते काय ? ‘अशा विवाहास मानसिक दृष्टीनेही हिंदु समाजाची सिद्धता व्हावी’, हा यामागचा उद्देश होता काय ? हिंदु मुलगा आणि मुसलमान मुलगी यांचाही विवाह असा पत्रिका छापून साजरा करण्यास मुसलमान समाज सिद्ध होईल का ?
हिंदू मतदान करत असल्याने या विवाहाचे समर्थन करतांना राज्यमंत्री बच्चू कडू यांना हिंदूंच्या भावनांचा विचार करण्याची आवश्यकता वाटली नाही !
राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांना असिफ आणि रसिका यांच्या आंतरधर्मीय विवाहाला व्यक्तिगतरीत्या समर्थन देण्याचा पूर्ण अधिकार आहे; पण सध्या ते केवळ आमदारच नाहीत, तर आघाडी शासनामध्ये महिला आणि बाल कल्याण राज्यमंत्रीही आहेत, म्हणजे ते शासनाचेही प्रतिनिधी आहेत. मग ‘अशा विवाहाला प्रोत्साहन देणे, हे आघाडी शासनाचे धोरण आहे काय ?’ बच्चू कडू यांना मतदान करणारे केवळ मुसलमानच नसून हिंदूही आहेत. मग या विवाहाला पाठिंबा देतांना हिंदूंच्याही भावनांचा विचार करण्याची आवश्यकता त्यांना का वाटली नाही ? अर्थात् यात बच्चू कडूंना फारसा दोष देता येणार नाही; कारण आपल्या भावना आणि अधिकार पायदळी तुडवल्या जात असतील, तरी हिंदु समाजाला त्याचे वैषम्य पूर्वीही कधी वाटत नव्हते अन् आजही वाटत नाही. उलट अशा लोकांना ते भरभरून मतदान करतात. मग हिंदु पुढार्यांनी हिंदूंच्या भावनांचा विचार तरी का करावा ?
एकेकाळी हिंदूंचा प्रभाव असलेल्या चित्रपटसृष्टीत मुसलमान कलाकारांनी हिंदु नावे घेतली !
हिंदी चित्रपटसृष्टीत झालेला आमूलाग्र पालट हिंदु समाजाने कोणतीही अप्रसन्नता न दाखवता कधीचाच निमूटपणे आणि आनंदाने स्वीकारला आहे. एक काळ असा होता की, चित्रपटसृष्टीत हिंदु नायक, नायिका, निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार यांचा प्रभाव होता. चित्रपटाचे कथानक हिंदु देवतांशी, हिंदु इतिहासाशी, हिंदु जीवनदृष्टी आणि शैलीशी निगडित होते. मुसलमान नटनट्यांचे प्रमाण जे काय थोडेफार होते, त्यांनाही मुसलमान नावाने चित्रपटरसिक स्वीकारणार नाहीत, ही भीती होती. त्यामुळे त्यांना हिंदु नावे धारण करून चित्रपटसृष्टीत वावरावे लागत होते. त्यांपैकी काही नट-नट्यांची नावे अशी, ‘मीना कुमारी (महजबीनबानो), दिलीप कुमार (महंमद युसुफ खान), मधुबाला (मुमताजजहां देहलवी), संजय (शहाअब्बास खान), जगदीप (सैय्यद इस्ताक अहमद जापुरी), जयंत (झकेरिया खान), अजित (हमीद अली खान) जॉनी वॉकर (बद्रुद्दीन जमालुद्दीन काजी), निम्मी (नबाबबानो), श्यामा (खुर्शीदबानो). अजूनही काही नावे असतील, तर ठाऊक नाही.
दाऊदसारख्या तस्करांनी पैसा ओतल्यावर खानांची भरती होणे आणि त्यांच्या पत्नी, तसेच नायिका दोन्ही हिंदूच असणे
जेव्हापासून दाऊद इब्राहीमसारख्या तस्करांनी या हिंदी चित्रपटसृष्टीत वारेमाप काळा पैसा ओतणे चालू केले, तेव्हा त्याच्या आदेशानुसार चित्रपटातील नट-नट्यांची नावे ठरू लागली. एकामागून एका खानाची भरती होऊ लागली. मुसलमान नटांना त्यांची नावे लपवण्याची आवश्यकता राहिली नाही. ते छाती फुगवून त्यांच्या ‘खान’ नावाने वावरू लागले. विशेष म्हणजे या सर्व खानांच्या वैयक्तिक जीवनातील बायकाही हिंदूच आहेत आणि पडद्यावरील नायिकाही हिंदूच आहेत.
हिंदूंनी चित्रपटसृष्टीतील पालट स्वीकारल्याने त्यांच्या देवतांची यथेच्छ टिंगल करण्याचे धैर्य ‘खानां’मध्ये निर्माण झाले आहे !
हिंदी चित्रपटसृष्टीतील वरील पालट हिंदूंनी पूर्णपणे आत्मसात केला आहे. आता खानांचे धैर्य एवढे वाढले आहे की, ते हिंदु धर्म, देवता, इतिहास, संस्कृती इत्यादींची टिंगलटवाळी करून त्यांचे विकृतीकरण करत आहेत ! आम्ही हिंदु चित्रपटरसिक टाळ्या वाजवून त्यांना डोक्यावर बसवून घेत आहोत आणि अमाप पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा त्यांच्या पदरात टाकत आहोत !
हे पण वाचा –
♦ ‘लव जिहाद’ रोकनेके उपाय तथा हिन्दू समाजको आवाहन
♦ लव जिहाद : हिन्दू युवतियों, स्त्रियों तथा अभिभावकों के लिए ध्यान में रखनेयोग्य सावधानियां
♦ लव जिहाद : हिन्दू युवतियो, झूठे प्रेमकी बलि चढकर आत्मघात न करो !
♦ ‘लव जिहाद’का प्रसार तेजीसे होनेके कुछ कारण
हे चारही लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.hindujagruti.org/hindi/hindu-issues/love-jihad
(क्रमश:)