संभाजीनगर येथे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘भोज’ उपाहारगृह प्रशासनाने बंद केले !
संभाजीनगर – उपाहारगृहात ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहक आणि कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याने जिल्हा प्रशासनाने येथील प्रसिद्ध भोज उपाहारगृह बंद केले.
Aurangabad Corona | हॉटेल, रेस्टॉरंट जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर, कोरोना नियम मोडल्यामुळे प्रसिद्ध हॉटेल ‘भोज’ला सीलhttps://t.co/2kMc56OLQC#Aurangabad | #Corona | #CoronaUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 9, 2022
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. भोज उपाहारगृहातील कर्मचारी मास्क न घालता खाद्यपदार्थ सिद्ध करत होते. जिल्हाधिकार्यांच्या या कारवाईमुळे शहरातील इतर उपाहारगृह मालकांचे धाबे दणाणले आहे.