वैदिक शरीररचना शास्त्र
वैदिक शरीररचना शास्त्रावर आजचे वैद्यकशास्त्र आधारित आहे. सुश्रुतसंहितेमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या ३०० शस्त्रक्रिया सांगितल्या आहेत. त्याच्या ४२ पद्धती दिलेल्या आहेत. शस्त्रक्रियेसाठी लागणार्या १२५ प्रकारच्या उपकरणांचे वर्णनही आहे. ‘एडवर्ड जेन्नर’ याने शोधून काढलेले लसीकरण आयुर्वेदात वापरले जात होते, हे सिद्ध झाले आहे. इंग्रजी भाषेत वापरला जाणारा ‘सर्जन’ हा शब्द ‘शल्यजन’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे.
तत्त्वज्ञ विल्यम जोन्स म्हणतो, ‘‘वेदांपासून आपल्याला शस्त्रक्रिया, वैद्यक, संगीत, बांधकामशास्त्र, यंत्रशास्त्र आणि हवामानशास्त्र अशा शास्त्रांचे ज्ञान मिळते.’’ वेद जाळले, तर माणसाला पशूवत् जीवन जगावे लागेल. आधुनिक मंडळी ‘माणसाचा उत्कर्ष करण्याऐवजी माणसाचा र्हास व्हावा आणि माणूस जंगली बनावा’, म्हणून प्रयत्न करत आहेत. अशा मंडळींची जागा कारावासातल्या अंधार कोठडीतच आहे.
(साभार : ‘धर्मभास्कर’ दीपावली विशेषांक, नोव्हेंंबर-डिसेंबर २०११)