पैशांसाठी अन्य देशांच्या अटी मान्य करण्याची पाकवर आली वेळ !
जिहादी पाकचे आर्थिक धिंडवडे !
इस्लामाबाद – बर्याच कालावधीपासून पाक हा कर्जाच्या डोंगराखाली दबला आहे. तो आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहिलेला नाही, हे पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी सांगून पाकला घरचा अहेर दिला आहे. पाक कर्जाच्या जाळ्यात इतका फसला आहे की, त्याला दुसर्या देशांच्या अटी मान्य कराव्या लागत आहेत, असे युसूफ यांनी म्हटले आहे.
युसूफ पुढे म्हणाले की, आमच्याकडे देशाच्या आवश्यकता भागवण्यासाठीची आर्थिक क्षमताच नाही. पाककडे आर्थिक स्वावलंबित्व नाही. त्यामुळे पाक हा अमेरिकेच्या प्रभावापासून स्वतंत्र होऊ शकत नाही. जेव्हा आम्ही आमच्या मागण्या देशातच पूर्ण करू शकत नाही, तेव्हा आम्ही विदेशी साहाय्याचा पर्याय निवडतो. ‘जेव्हा तुम्ही अशा प्रकारे इतर देशांकडून कर्ज घेता, तेव्हा तुमचे आर्थिक सार्वभौमत्व धोक्यात येते. त्याचा तुमच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम होतो’, असेही युसूफ यांनी नमूद केले आहे.