गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण !
मुंबई – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, लता मंगेशकर यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे; मात्र त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना सौम्य लक्षणे असून ऑक्सिजनची आवश्यकता भासणार नाही.