सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याप्रती रामनाथी आश्रमातील कु. वैष्णवी माने (वय १९ वर्षे) यांनी व्यक्त केलेली भावपूर्ण कृतज्ञता !
१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे साधिकेला त्रासातून बाहेर पडता येणे
‘सद्गुरु काका, मला अकस्मात् तुमची आठवण येऊन तुम्हाला भेटावेसे वाटत होते. सद्गुरु काका, तुम्ही आमच्यासाठी पुष्कळ करता. आम्हा आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांचे तुम्ही आधार आहात. काका, प्रत्येक वेळी मला त्रास होत असतांना तुम्ही केलेल्या आणि दिलेल्या नामजपामुळे मी सकारात्मक राहून त्रासातून बाहेर पडू शकते.
२. मला तुमच्याशी बोलतांना नेहमीच ‘सद्गुरु काका’ असे म्हणण्याऐवजी ‘सद्गुरु बाबा’ असे म्हणावेसे वाटते. तुम्ही मला माझे बाबाच वाटता. तुम्ही साधकांसाठी रात्रंदिवस अविरत झटत असता.
३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा आवाज ऐकल्यावरच ५० टक्के त्रास न्यून होत असल्याचे जाणवणे आणि त्यांच्यातील प्रीतीमुळे साधकांना साधना करण्यासाठी बळ मिळणे
आम्ही तुम्हाला नामजपादी उपाय विचारायला येतो किंवा भ्रमणभाष करतो, तेव्हा तुमचा आवाज ऐकल्यावरच आमचा ५० टक्के इतक्या प्रमाणात त्रास न्यून होतो. सद्गुरु काका, तुमच्या प्रीतीमुळेच आम्हाला साधना करण्यासाठी बळ मिळत आहे. सद्गुरु काका, तुमच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
४. सद्गुरु काका, तुम्हाला भेटल्यावर किंवा तुमच्याशी बोलल्यावर ‘गुरुमाऊलींनाच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) भेटत आहे आणि गुरुमाऊलींशीच बोलत आहे’, असे मला वाटते.
५. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘सद्गुरु काका, माझ्याकडून परात्पर गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना होऊन मला हिंदु राष्ट्रासाठी घडता येऊ दे. सर्व साधकांवर तुमची कृपादृष्टी अखंड राहू दे’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !’
परात्पर गुरुदेव आणि सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांच्या चरणी भावपूर्ण नमस्कार अन् कोटीशः कृतज्ञता!’
– कु. वैष्णवी माने (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.९.२०२०)
|