सर्वोच्च न्यायालयातील ४ न्यायाधिशांना कोरोनाची लागण
सर्वोच्च न्यायालयाचे १५० कर्मचारी कोरोनाबाधित
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयातील ४ न्यायाधिशांना कोरोनाची लागण झाली आहे. काही माध्यमांच्या माहितीनुसार निवृत्त होत असलेल्या एका न्यायाधिशाच्या मेजवानीमध्ये हे संक्रमण पसरले. याशिवाय सर्वोच्च न्यायालयातील अनेक कर्मचार्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात ३ सहस्रांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून त्यांपैकी १५० कर्मचार्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
4 judges, 5 percent Supreme Court staff, 400 Parliament workers test Covid positive#OmicronInIndia #COVID19 https://t.co/jY2nx4PN3J
— India TV (@indiatvnews) January 10, 2022
३ जानेवारीपासून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून सुनावणीला प्रारंभ
देहलीमध्ये कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन्.व्ही. रामण्णा यांनी २ जानेवारी या दिवशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ च्या माध्यमातून सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. ही पद्धत ३ जानेवारीपासून पुढील २ आठवड्यांसाठी लागू करण्यात आली होती. या कालावधीत न्यायाधिशांना त्यांच्या निवासस्थानांतूनच ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ च्या माध्यमातून सुनावणी घेण्यास सांगण्यात आले होते.