राधानगरी प्रांताधिकारी (जिल्हा कोल्हापूर) प्रसेनजित प्रधान आणि सरपंच संदीप डवर यांना लाच घेतांना अटक !
भ्रष्टाचारग्रस्त भारत ! अशा लाचखोरांना जन्माची अद्दल घडेल अशी शिक्षा दिल्याविना इतरांना जरब बसणार नाही !
कोल्हापूर – स्टोन क्रशर व्यावसायिकावर झालेली कारवाई टाळण्यासाठी साडेपाच लाख रुपयांची लाच स्वीकारणारे राधानगरी प्रांताधिकारी प्रसेनजित प्रधान आणि फराळे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप डवर यांना लाचलुचपत विभागाने ९ जानेवारी या दिवशी अटक केली आहे. या प्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, सरपंच संदीप डवर यांनी ११ लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी १० लाख रुपये प्रांताधिकार्यांसाठी आणि स्वत:साठी प्रत्येक मासाला १ लाख रुपयांची मागणी केली होती. यातील साडेपाच लाख रुपये स्वीकारत असतांना लाचलुचपत पथकाने दोघांनाही ९ जानेवारीला अटक केली आहे. प्रांताधिकार्यारख्या वरिष्ठ अधिकार्यास अटक झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.