गोव्यात कोरोनाबाधित १ सहस्र ५९२ नवीन रुग्ण
कोरोनाबाधित एकूण रुग्णसंख्या १० सहस्रांहून अधिक
पणजी, १० जानेवारी (वार्ता.) – गोव्यात १० जानेवारी या दिवशी कोरोनाबाधित १ सहस्र ५९२ नवीन रुग्ण आढळल्याने राज्यातील प्रत्यक्ष उपचार घेणार्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १० सहस्र १३९ झाली आहे. कोरोनाच्या चाचणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे दिवसभरातले प्रमाण २७.८ टक्के आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि ते घरी अलगीकरणात आहेत.
गोव्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीची वर्धक मात्रा (बूस्टर डोस) देण्यास प्रारंभ
गोवा शासनाने आरोग्य क्षेत्रातील, तसेच आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक (वयोमर्यादा ६० वर्षांहून अधिक) यांच्यासाठी गोव्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीची वर्धक मात्रा (बूस्टर डोस) देण्यास १० जानेवारीपासून प्रारंभ झाला. कोरोना प्रतिबंधात्मक लसीची दुसरी मात्रा घेऊन ९० दिवस उलटलेले ‘बूस्टर’ मात्रा घेण्यास पात्र आहेत.