प्रत्येक सेवा मनापासून करणारे युवा साधक श्री. ज्ञानदीप चोरमले यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
प्रत्येक सेवा मनापासून करणारे मूळचे इंदापूर (जिल्हा पुणे) येथील युवा साधक श्री. ज्ञानदीप चोरमले (वय १९ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
सोलापूर – लहान वयातच अखंड गुरुसेवेचा ध्यास असणारे आणि प्रत्येक सेवा मनापासून करणारे मूळचे इंदापूर येथील युवा साधक श्री. ज्ञानदीप चोरमले (वय १९ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सनातनच्या ११२ व्या समष्टी संत पू. (कु.) दीपाली मतकर यांनी दिली. २ जानेवारी २०२२ या दिवशी सोलापूर सेवाकेंद्रात झालेल्या एका सत्संगात ही आनंदवार्ता देण्यात आली. या वेळी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी श्री. ज्ञानदीप यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. लहान वयातच सेवेच्या माध्यमातून साधकांची मने जिंकणार्या युवा साधकाची झालेली प्रगती पाहून सर्वच साधकांचा आनंद द्विगुणीत झाला.
मागील सप्ताहात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सेवाकेंद्रातील साधकांना ‘साधनेचे प्रयत्न भावपूर्ण आणि परिपूर्ण कसे करावेत ?’ याविषयी मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे या सप्ताहात साधकांनी कोणते प्रयत्न केले ? याचा आढावा २ जानेवारीच्या सत्संगात घेण्यात येत होता. सर्व साधकांचा आढावा झाल्यानंतर श्री. ज्ञानदीप यांनीही ‘स्वत:कडून साधनेचे कसे प्रयत्न चालू आहेत ?’ याचा आढावा दिला. सर्व साधकांचा आढावा सांगून झाल्यानंतर पू. (कु.) दीपाली मतकर आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘साधकांनी साधनेचे प्रयत्न आणखी वाढवण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत ?’ याविषयी मार्गदर्शन करतांना श्री. ज्ञानदीप यांनी आध्यात्मिक प्रगती केल्याची आनंदवार्ता दिली. या वेळी सेवाकेंद्रातील अन्य साधकांनीही श्री. ज्ञानदीप यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली ! – ज्ञानदीप चोरमले (वय १९ वर्षे)
प्रगती झाल्याची वार्ता ऐकून गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) पुष्कळ कृतज्ञता वाटली. गुरुदेवांनीच माझ्याकडून प्रयत्न करवून घेतले आणि तेच करवून घेत आहेत. काही मास रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहायला असतांना तेथे अनेक भावसत्संगांना उपस्थित रहाण्याची संधी लाभली, त्या वेळी ‘आपणही अन्य साधकांप्रमाणे अध्यात्मात प्रगती करायला हवी’, असे प्रकर्षाने वाटत होते.
ज्ञानदीप यांची प्रगती झाल्याचे ऐकून गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली !- सौ. अश्विनी चोरमले, (श्री. ज्ञानदीपची आई)
ज्ञानदीपची प्रगती झाल्याची आनंदवार्ता ऐकून गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि पू. (कु.) दीपाली मतकर याच त्याच्या खर्या माता आहेत. त्यांनी ज्ञानदीपला वेळोवेळी साधनेविषयी मार्गदर्शन केल्यामुळेच त्याची प्रगती झाली आहे.
ज्ञानदीप त्याच्यातील गुणांमुळे सहजतेने इतरांचे मन जिंकतो ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्थाश्री. ज्ञानदीपमध्ये पुष्कळ निरागसता आणि भाव आहे, त्याच्यातील या गुणांमुळे तो सहजच प्रत्येकाचे मन जिंकतो. त्याला कुणीही सेवा सांगितली, तरी तो ती तत्परतेने आणि मनापासून करतो. त्यामुळेच त्याची साधनेत प्रगती झाली. |