(म्हणे) ‘काँग्रेस गोव्यात ‘अल्पसंख्यांक आयोग’ स्थापन करणार !’
गोव्यात सर्वधर्मीय सलोख्याने रहातात आणि येथे समान नागरी कायदा आहे. अल्पसंख्यांक आयोग स्थापन करून हा धार्मिक सलोखा काँग्रेसमधील अल्पसंख्यांकांना बिघडवायचा आहे का ? – संपादक
पणजी, १० जानेवारी (वार्ता.) काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय नेते इम्रान प्रतापगढी यांनी गोव्यातील अल्पसंख्याकांना त्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि समाजाचे हित साधणे, यांसाठी गोव्यात ‘अल्पंसंख्यांक आयोग’ स्थापन करण्याचे आश्वासन दिले. इम्रान प्रतापगढी पणजी येथे एका पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित करत होते.
.@BJP4Goa is trying to make Goa a coal hub. We need to stop these anti-people policies of the BJP.
–@ShayarImran
Chairman, Minority Department, AICC pic.twitter.com/kZcOVK11XI— Goa Congress (@INCGoa) January 10, 2022
ते पुढे म्हणाले, ‘‘अल्पसंख्यांक आयोग’ स्थापन करणे, ही काळाची आवश्यकता आहे. मी वचन देतो की, काँग्रेस सत्तेवर आल्यावर आम्ही ‘अल्पसंख्यांक आयोग’ स्थापन करणार. कबरस्तानसाठी भूमीचा प्रश्नही सोडवणार.’’