सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर यात्रा रहित !

श्री सिद्धरामेश्वर मंदिर

सोलापूर – ‘५० मानकर्‍यांच्या उपस्थितीतच ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा करा’, असा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला, त्यासाठी मानकर्‍यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस अनिवार्य करण्यात आले आहेत. प्रत्येक मानाच्या नंदीध्वजासमवेत ५ मानकरी याप्रमाणे ७ नंदीध्वजांसमवेत ३५ जण असतील, तसेच १५ पुजार्‍यांना अनुमती असेल. यात्रेतील ७ नंदीध्वजांची पायी मिरवणूकही रहित करण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षीही यात्रा रहित करण्यात आली होती, त्यामुळे सलग दुसर्‍या वर्षीही सोलापूरकरांना श्री सिद्धेश्वर यात्रेपासून वंचित रहावे लागणार आहे.

आदेशातील काही ठळक सूत्रे

१. सिद्धेश्वर मंदिर सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत चालू राहील, तिथे सुरक्षारक्षक असावेत.

२. धार्मिक विधींचे थेट प्रक्षेपण समाजमाध्यमांतून करा. मुखदर्शनासाठी ई-पास देण्यात यावेत.

३. कार्यक्रमासाठी उपस्थित रहाणार्‍यांना पास द्यावेत आणि त्यांची माहिती पोलिसांना द्यावी.