कार्यक्रमांतून हिंदु धर्माचा अवमान करणार्यांच्या विरोधात न्यायालयीन लढा द्या ! – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते आणि उद्योजक, कर्नाटक
विविध कार्यक्रमांत हिंदु धर्माविषयी विनोद केला गेल्यास त्याच वेळी आक्षेप घेतला जात नाही. जोपर्यंत प्रेक्षक जागरूक होत नाहीत, तसेच जागरूक हिंदू या विरोधात आवाज उठवत नाहीत, तोपर्यंत विविध कार्यक्रमांतून ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’च्या नावाखाली हिंदु धर्माचा अवमान होतच रहाणार. या देशात हिंदु आणि मुसलमान यांच्यासाठी दोन वेगवेगळ्या ‘अभिव्यक्तीस्वतंत्रता’ आहेत ! ‘जगात केवळ इस्लाम धर्म आहे’ असे कट्टर धर्मांध मानतात. जगात महंमद पैगंबर किंवा इस्लाम यांविषयी कुणीही बोलले, तर त्यांची हत्या केली जाते किंवा घरे जाळली जातात. हिंदु धर्माचा अवमान करण्यासाठी ‘बॉलीवूड’ला मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जातो आणि या चित्रपटांतून हिंदू अन् हिंदु धर्म यांचे चुकीचे चित्रण दाखवले जाते. या षड्यंत्राच्या विरोधातही आपण जागरूक होऊन त्याला विरोध करणे आवश्यक आहे. हिंदूंनी आता पुढे येऊन या विरोधात तक्रारी प्रविष्ट करून न्यायालयीन लढा दिला पाहिजे.