पत्रकारदिनाच्या निमित्ताने ‘भुईंज प्रेस क्लब’च्या वतीने भृगुऋषि मठ आणि महालक्ष्मी मंदिर यांची स्वच्छता !
सातारा, ९ जानेवारी (वार्ता.) – पत्रकारदिनाचे औचित्य साधत आणि आपला सांस्कृतिक वारसा जतन करणे, हे आपले आद्यकर्तव्य आहे. याची जाणीव ठेऊन ‘भुईंज प्रेस क्लब’च्या वतीने भृगुऋषि यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या आणि कृष्णातिरी असणार्या भृगुऋषि मठाची, तसेच श्री महालक्ष्मी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. तसेच भुईंज ते अहमदाबाद हे ८०० किलोमीटर अंतर सायकलवरून पूर्ण करणार्या ‘सायकल वेडे ग्रुप’च्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आध्यात्मिक ग्रंथ देऊन त्यांचाही सत्कार केला.