तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ‘३१ डिसेंबर’विरोधी जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
भाग्यनगर – ‘१ जानेवारी हिंदूंचे नववर्ष नाही’ आणि ‘हिंदूंचे १ दिवसाचे होणारे धर्मांतर रोखा !’, याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१. प्लेकार्ड (फलक) प्रदर्शन
भाग्यनगर, इंदूर, नंदिपेट आणि करिनगर या ४ ठिकाणी ‘प्लेकार्ड प्रदर्शन’ लावण्यात आले.
२. निवेदन देणे
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणार्या सार्वजनिक समारंभांवर प्रतिबंध घालावा, यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यासमवेत शाळा-महाविद्यालयांमधील कुप्रथा थांबवण्यासाठी एकूण ४४ विद्यालये आणि विद्यापीठ यांना निवेदन देण्यात आले.
३. फलक प्रदर्शन
‘१ जानेवारीच्या दिवशी नवीन वर्षांच्या शुभेच्छा देऊ नका’, तसेच ‘१ दिवसाचे धर्मांतर रोखा !’, या विषयांवर फलक प्रदर्शन लावून जागृती करण्यात आली.
४. हस्तपत्रकांचे वितरण
काही धर्मप्रेमींनी स्वत:हून हस्तपत्रके वितरीत करून लोकांमध्ये जागृती केली.
५. विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचन
धर्मशिक्षण वर्गाला उपस्थित रहाणारे धर्मप्रेमी आणि प्रोफाईल सदस्य यांच्यासाठी एका विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले.
६. धर्मप्रेमींना कृतीशील करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न
अ. धर्मशिक्षणवर्गाला उपस्थित रहाणारे धर्मप्रेमी श्री. कोप्पुला रामकृष्ण यांनी त्यांच्या गावातील प्रमुख मंदिरांमध्ये १० फ्लेक्स लावले.
आ. श्री. धोनीश्वर यांनी त्यांच्या नंद्याल या गावामध्ये एकट्याने ३ ठिकाणी निवेदन दिले आणि एका मंदिरामधील फलकावर विषय लिहिला.
इ. श्री. सूरी निकांक्ष यांनी एका मंदिरामध्ये २ वेळा फलक लिखाण केले.
ई. हिंदु जनजागृती समितीने ख्रिस्ती नववर्ष साजरे न करण्याविषयीचे सिद्ध केलेले लिखाण धर्मप्रेमींनी व्हॉट्सॲप, फेसबूक आणि ट्विटर या सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित केले.
प्लेकार्ड (फलक) प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाग्यनगर येथे ‘प्लेकार्ड’ प्रदर्शन लावण्यात आले. यामध्ये ‘युनायटेड हिंदु मुव्हमेंट’, ‘मनगुडी’ अशा विविध संघटनांच्या २० धर्मप्रेमींनी सहभाग घेतला. रस्त्यावरून जाणार्या अनेकांनी प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला. काहींनी समितीच्या हस्तपत्रकांचे वितरण केले. एक व्यक्ती गाडी थांबवून या प्रदर्शनामध्ये थोडा वेळ सहभागी झाली. अशाच प्रकारे इंदूर येथेही ‘प्लेकार्ड प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले होते.
वैशिष्ट्यपूर्ण
एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले, ‘‘जे काम आम्ही करू शकलो नाही, ते काम तुम्ही लोक करत आहात, त्याबद्दल तुमचे अभिनंदन !’’
क्षणचित्रे
१. ३१ डिसेंबरच्या विरोधात जागृती करण्यासाठी एक तेलुगु भाषेतील चित्रफीत सिद्ध करण्यात आली होती. या चित्रफितीला चांगला प्रतिसाद मिळाला. ही चित्रफित पाहून अनेकांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. या चित्रफितीचा फेसबूकवरून मोठ्या प्रमाणात प्रसार झाला.
२. इंदूर येथील ‘प्लेकार्ड प्रदर्शना’चे एका स्थानिक वृत्तवाहिनीने चित्रीकरण करून त्याचे प्रसारण केले.