सनातन संस्थेच्या वतीने गरीब मुलांना सनातनच्या ‘संस्कार वह्या’ आणि ग्रंथ यांचे विनामूल्य वितरण
देहली – सनातन संस्थेच्या वतीने वेळोवेळी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. या अंतर्गत संस्थेच्या वतीने स्थानिक गीता कॉलनी येथील स्वयंसेवी संस्था ‘गॉड गिव्स एव्हरिथिंग’च्या ५० हून अधिक गरीब मुलांना २ जानेवारी २०२२ या दिवशी सनातननिर्मित ‘संस्कार वही’ आणि व्यक्तिमत्त्व विकासविषयक ग्रंथ यांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. मुलांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास व्हावा आणि अभ्यास करतांना त्यांना साहाय्य व्हावे, यादृष्टीने ग्रंथांचे वितरण करण्यात आले. सनातन संस्थेच्या अधिवक्त्या कु. कृतिका खत्री, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा आणि श्री. प्रतीक यादव यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले. या वेळी ‘गॉड गिव्स एव्हरिथिंग’चे व्यवस्थापक श्री. आशिष गुप्ता उपस्थित होते.