देशाच्या विरोधात कार्य करणार्या अंतर्गत शत्रूंवर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्रशासनाने नवा कायदा करावा ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
आता युद्धनीतीत पालट झाला आहे. त्यामुळे सीमेवरील शत्रूंसह अंतर्गत देशद्रोह्यांविरुद्धही सैन्याला लढावे लागत आहे. त्रिपुरामध्ये मशीद पडल्याच्या अफवेवर महाराष्ट्रात धर्मांधांनी ६ ठिकाणी दंगली केल्या. पुढे अशा घटना आणखी वाढतील. अराजकता पसरवणार्यांच्या विरोधात देशवासियांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. सैन्याचा अपमान करणारे आणि देशाच्या विरोधात कार्य करणार्या अंतर्गत शत्रू यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी केंद्रशासनाने नवीन कायदा केला पाहिजे, तसेच सर्व देशप्रेमींनी एकत्र येऊन देशद्रोह्यांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे.