लोकांची गर्दी होत असेल, तर मद्याची दुकानेही बंद करावी लागतील ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

धार्मिक स्थळांविषयी टप्प्याटप्याने निर्णय घेऊ !

राजेश टोपे

जालना – गर्दी होत असेल, तर मद्याची दुकानेही बंद करावी लागतील, अशी चेतावणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ९ जानेवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत असल्याने नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून रुग्णालयांत बेड अल्प पडत नाहीत, तोपर्यंत आणखी नवीन निर्बंध लावले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल, तर त्याविषयी टप्प्याटप्याने निर्णय घेण्यात येतील. राज्यात ऑक्सिजनची नगण्य मागणी वाढली आहे. कोरोना झालेल्या १८ वर्षांवरील मुलांना मधुमेह होण्याचा धोका वाढला आहे, असा अहवाल आहे.