आजपासून सांगली महापालिका कार्यालयासह खासगी आस्थापनांमध्ये ‘मास्क’विना प्रवेश नाही ! – नितीन कापडणीस, आयुक्त, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका
सांगली, ९ जानेवारी (वार्ता.) – १० जानेवारीपासून सांगली महापालिका कार्यालयासह खासगी आस्थापनांमध्येही ‘मास्क’ची सक्ती असून नागरिकांना ‘मास्क’विना प्रवेश देण्यात येऊ नये. विनामास्क आणि गर्दी अशांवर महापालिका क्षेत्रात कारवाईसाठी १० पथके नियुक्त केली आहेत, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
१. महापालिका क्षेत्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. अनेक खासगी आस्थापनांमध्ये अद्यापही गर्दी आहे. आस्थापनाधारकांनी आस्थापनांमध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
२. कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढल्यास आणि आवश्यकता भासल्यास महापालिकेचे स्वतंत्र कोरोना रुग्णालय पुन्हा कार्यान्वित केले जाईल. महापालिकेच्या क्षेत्रात कोरोना लसीकरणावर अधिक भर दिला जाणार असून १५ ते १८ वर्षे वयोगटाचे लसीकरण प्राधान्याने शाळांमध्येच केले जात आहे.
३. महापालिकेच्या क्षेत्रात अधिकाधिक ‘आर.टी.पी.सी.आर्.’ चाचण्यांवर भर दिला जाणार आहे.