देशात गेल्या २४ घंट्यांत १ लाख ५९ सहस्र नागरिक कोरोनाबाधित !
जनतेकडून कोरोनाच्या संदर्भातील प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जात नसल्यानेच ही रुग्णवाढ होत आहे, हे लक्षात घेऊन जनतेने नियमांचे पालन केले पाहिजे ! बेशिस्त जनता कोरोनाला आमंत्रित करत आहे, हे भारतियांना लज्जास्पद ! – संपादक
नवी देहली – देशात गेल्या २४ घंट्यांत १ लाख ५९ सहस्र ४२४ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर ३२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच वेळी ४० सहस्रांपेक्षा अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात गेल्या २४ घंट्यांमध्ये ४१ सहस्र ४३४ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यात आजपासून कठोर निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत.
📍#COVID19 Active Cases in India (As on 9th January, 2022): 5,90,611
✅Keep following #COVIDAppropriateBehaviour
➡️Always wear a mask
➡️Wash/sanitize hands regularly
➡️Maintain distancing
➡️Get yourself fully vaccinated#We4Vaccine#Unite2FightCorona pic.twitter.com/2eElqfq8S6— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) January 9, 2022