आत्मकूर (आंध्रप्रदेश) शहरामध्ये अवैध मशिदीला विरोध करणार्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांकडून पोलीस ठाण्यातच आक्रमण !
|
|
कुर्नूल (आंध्रप्रदेश) – आत्मकूर शहरामध्ये पद्मावती शाळेच्या मागील अनधिकृत मशिदीचा विरोध केल्याने धर्मांधांच्या जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण केले. धर्मांधांनी या वेळी वाहनांची तोडफोड करत दगडफेक केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबार केला. येथे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. येथे तणावाचे वातावरण आहे. या आक्रमणात भाजपचे काही नेते घायाळ झाले. या घटनेच्या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत रेड्डी यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या वेळी रेड्डी यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली.
अवैध मस्जिद निर्माण के विरोध पर हिंसक हुई मुस्लिम भीड़, पुलिस के सामने ही BJP कार्यकर्ताओं पर हमला: गाड़ियाँ तोड़ी, पत्थरबाजी भी#Kurnool #Atmakurhttps://t.co/ZAg0iIzra6
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 9, 2022
१. भाजपचे राज्याचे सरचिटणीस विष्णुवर्धन रेड्डी यांनी माहिती देतांना सांगितले की, आत्मकूर शहरातील अवैध बांधकांमाविषयी भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारला प्रश्न विचारले होते. याविषयी कार्यकर्त्यांनी प्रशासनकडे जाऊन विरोध केला, तेव्हा धर्मांधांनी पोलिसांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण केले. त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. हे लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे. भाजप या घटनेचा निषेध करतो.
२. याविषयी आंध्रप्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले की, कुर्नूलमध्ये काही लोक हिंसा भडकावू इच्छित होते. धर्माच्या नावावर लोकांना भडकावणार्यांवर पोलीस कठोर कारवाई करील. याविषयी पोलीस अधीक्षकांना आदेश देण्यात आला आहे.