‘‘भारताचे दुसरे विभाजन रोखायचे असेल, तर ‘वीर सावरकर : दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ हे पुस्तक प्रत्येक भारतियाने वाचावे !’’
केंद्रीय माहिती आयुक्त आणि प्रख्यात लेखक उदय माहूरकर यांचे पणजी, गोवा येथे संपादक अन् पत्रकार संवाद कार्यक्रमात प्रतिपादन
पणजी, ८ जानेवारी (वार्ता.) – मुसलमानांच्या तुष्टीकरणामुळे देशाची मोठी हानी झाली आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वातंत्र्यवीर सावरकर हे ‘पितामह’ होते आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण कृती केली असती, तर देशाचे विभाजन झाले नसते आणि भारत देश आज ‘विश्वगुरु’ स्थानावर आरूढ झाला असता. देशाचे आता दुसरे विभाजन रोखायचे असले, तर प्रत्येक भारतियाने ‘वीर सावरकर : दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ हे पुस्तक अवश्य वाचावे, असे आवाहन केंद्रीय माहिती आयुक्त आणि प्रख्यात लेखक श्री. उदय माहूरकर यांनी संपादक आणि पत्रकार यांच्याशी संवाद साधतांना केले. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची उपस्थिती होती.
केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर आणि सहलेखक चिरायू पंडित यांनी ‘वीर सावरकर : दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर ८ जानेवारीपासून २ दिवस गोवा दौर्यावर आहेत. या निमित्ताने हॉटेल डेलमॉन, पणजी येथे संपादक आणि पत्रकार यांच्याशी संवाद कार्यक्रमात वार्तालाप करतांना केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांनी हे आवाहन केले.
या कार्यक्रमात श्री. उदय माहूरकर यांनी पुढील महत्त्वाची सूत्रे सांगितली –
१. ‘इस्लामी कट्टरवाद’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांची राष्ट्रीय सुरक्षा’ आणि ‘इतिहासाचे विकृतीकरण’ या विषयांवर मी संशोधन केले आहे. ‘इस्लामी कट्टरवादा’च्या अंतर्गत कट्टरवादी, कट्टरवाद मध्यम स्वरूपाचा असलेले आणि सर्वसामान्य मुसलमान, असे ३ भाग करता येतील. ‘इस्लामी कट्टरवाद’ या विषयावर मी अभ्यास केल्यामुळे मला स्वातंत्र्यवीर सावरकर समजण्यास खूप साहाय्य झाले.
२. यापूर्वी मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कुणी विरोध करत असल्यास ‘सावरकर यांनी अंदमानमध्ये किती हालअपेष्टा सहन केल्या आणि त्यांच्यावर टीका करणे योग्य नव्हे’, असे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची योग्य बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होतो; मात्र यापूर्वी बचावासंबंधी सूत्रे योग्य पद्धतीने मांडली गेली नाहीत. देशाची फाळणी होऊ नये यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेली प्रभावी सूत्रे मांडली पाहिजेत.
🔴 CHANGE IN VENUE & TIME 🔴 🌸 Book Release Ceremony 🌸 Authored by Shri. Uday Mahurkar and Shri. Chirayu Pandit 📔 Veer Savarkar 🔸 Venue : Rajaram Smruti Sabhagruh of the Gomantak Maratha Samaj, Dayanand Smruti Apartment, 4th floor, Panaji, Goa 🔸 Sunday, 9 January 2022 Watch Live 🚩 Organiser : Hindu Janajagruti Samiti |
#Veer_Savarkar_book_Launch_Goa University today!
📔 Veer #Savarkar : The Man Who Could Have Prevented Partition
Veer Savarkar is a symbol of India’s integrity and unity and those who want to keep India divided will continue to hate him- @UdayMahurkar@OpIndia_com @SwarajyaMag pic.twitter.com/g2jEE5aoWT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 9, 2022
३. ‘हिंदूंना यातना भोगण्यास लावून हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये युती करणे’ आणि ‘संपूर्ण अहिंसा’ या २ तत्त्वांवर देशाचे विभाजन झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘‘गांधी यांची ‘संपूर्ण अहिंसा’ हे तत्त्व म्हणजे ‘सद्गुणविकृती’ आहे. ’’ मुसलमानांच्या तुष्टीकरणामुळे देशाची मोठी हानी होईल, असे स्वा. सावरकर यांनी सांगितले होते. पाकिस्तान देशाची निर्मिती करणे म्हणजे काँग्रेस पक्षाने केलेला एक ‘सेल्फ गोल’ (फूटबॉल खेळामध्ये एखाद्या गटाने स्वत:वरच ‘गोल’ करण्यासारखे) आहे.
Indians,
Mother tongue plays an integral role in retaining very essence of being Indian.#Savarkar ji’s relentless efforts to get rid off foreign words from Marathi is very much relevant even today
Excerpts: @satchidanand_s ji’s ʻ…आणि सावरकरʼ#Veer_Savarkar_book_Launch_Goa pic.twitter.com/EKp7fAuYgM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 9, 2022
४. चीनकडे ‘हायड्रोजन’ बाँब असेल, तर भारताने ‘ऑक्सिजन’ बाँब निर्माण केला पाहिजे. देशाची सैन्यशक्ती हीच देशाची शक्ती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राष्ट्रवाद हा विनाअट राष्ट्रवाद आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते देशाचा गौरव हा कोणतीही जात आणि धर्म यांच्या गौरवापेक्षा अल्प नाही.
५. ‘मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी गुलाम बनलेले आणि हिंदु संस्कृतीचा तिरस्कार करणारे’ यांविषयी अधिक माहिती घेण्यासाठी ‘वीर सावरकर : दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे. देशाच्या चांगल्या नेत्यांनी केलेल्या कार्यावर चर्चा झाली पाहिजे आणि यापूर्वी झालेल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत.
Even a million words won’t suffice to elaborate greatness of Veer #Savarkar
To say “He cannot be confined in a Bharat Ratna” won’t be an exaggeration!
Wokes can’t understand Savarkar but a billions Hindus can!
Do read @UdayMahurkar ji’s book#Veer_Savarkar_book_Launch_Goa pic.twitter.com/utFyBKqLUY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 9, 2022
६. हिंदूंच्या ‘राम’, ‘कृष्ण’ आणि ‘शंकर’ या प्रमुख देवता आहेत आणि या देवतांची देशातील प्रमुख मंदिरे मुसलमानांच्या तुष्टीकरणामुळे अजूनही हिंदूंना मिळालेली नाहीत. ‘वीर सावरकर : दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे वाचन केल्याने प्रत्येक भारतियाच्या मनात एक नवीन विचार आणि ऊर्जा निर्माण होणार आहे.