‘सनातन पंचांग २०२२ – हिंदी’ या ‘अॅप’चे भारत शासनाचे माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांच्या हस्ते लोकार्पण !
रामनाथी (गोवा) – भारत शासनाचे माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला ८ जानेवारी या दिवशी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री. माहूरकर यांच्या हस्ते ‘सनातन पंचांग २०२२ – हिंदी’ या ‘अॅप’चे लोकार्पण करण्यात आले.
मागील १० वर्षांपासून सनातन पंचांग मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगु आणि तमिळ या ७ भाषांमध्ये प्रकाशित केले जात आहे. ‘सनातन पंचांग २०२२’ या ‘अॅप’मध्ये धर्मरक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या संदर्भात सोपी माहिती दिली आहे. यात पंचांग आणि मुहूर्त यांसमवेतच सण, व्रते, धर्मशिक्षण, राष्ट्र-धर्म रक्षण, आयुर्वेद, उपचारपद्धती, अध्यात्म इत्यादी विविध विषयांवरील सर्वांगीण उपयुक्त माहितीही देण्यात आली आहे. विविधतापूर्ण माहितीने नटलेले हे ‘अॅप’ सर्वसाधारण हिंदूंना दैनंदिन जीवनात मार्गदर्शक असल्यामुळे हिंदु सामाजाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.
भ्रमणभाषवरील ‘अँड्रॉईड प्रणाली’वरील ‘सनातन पंचांग’ आतापर्यंत २५ लाखांहून अधिक, तर ‘iOS प्रणाली’वरील ‘सनातन पंचांग’ ५ लाखांहून अधिक लोकांनी ‘डाऊनलोड’ केले आहे. ज्योतिषशास्त्र, अध्यात्मशास्त्र, तसेच आपत्काळात जिवितरक्षण होण्यासाठी करायचे उपाय यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण ‘विजेट्स’ सह (मुख्य पानावरील माहितीदर्शक चौकटीसह) हे ‘अॅप’ ‘गूगल प्ले स्टोअर’, तसेच ‘अॅपल स्टोअर’च्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेे.
‘सनातन पंचांग २०२२’ ‘अॅप’ हे https://sanatanpanchang.com/ या संकेतस्थळावरही ७ भाषांत उपलब्ध आहे.