हिंदु संघटनांच्या विरोधानंतर विनोदी अभिनेता मुनावर फारूकी याचा भाग्यनगर (तेलंगाणा) येथील कार्यक्रम रहित !
हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकीचे यश ! अशाच प्रकारे समस्त हिंदू संघटित झाल्यास कुणीही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करू धजावणार नाही ! – संपादक
भाग्यनगर (तेलंगाणा) – हिंदु संघटनांच्या विरोधानंतर विनोदी अभिनेता मुनावर फारूकी याचा भाग्यनगर (तेलंगाणा) येथील कार्यक्रम रहित करण्यात आला.
तेलंगाणा राज्याचे नगरविकास मंत्री के.टी. रामाराव यांनी फारूकी याला कार्यक्रमाठी निमंत्रित केले होते. (हा हिंदुद्वेष नव्हे का ? – संपादक) यावर फारूकी त्याने ‘९ जानेवारीला भाग्यनगर येथे कायक्रम करीन’, असे सांगितले होते. ही माहिती मिळताच ‘हिंदु जॉइंट अॅक्शन कमिटी’, हिंदु जनजागृती समिती आदी १५ हिंदु संघटनांनी पोलीस महासंचालकांना निवेदन देऊन हा कार्यक्रम रहित करण्याची मागणी करण्यात आली. यासह धर्माभिमान्यांकडून याविषयी मोठ्या प्रमाणात ट्वीट करण्यात आले. याविषयी भाजपचे आमदार टी. राजा सिंह, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय आणि भाजपचे खासदार धर्मपुरी अरविंद यांनीही सरकारला हा कार्यक्रम रहित करण्याची चेतावणी दिली. इतकेच नव्हे, तर ‘हिंदु जॉइंट अॅक्शन कमिटी’कडून उच्च न्यायालयात याचिकाही प्रविष्ट करण्यात आली आहे. यावर ७ जानेवारीला सुनावणी करण्यात येणार होती; मात्र ६ जानेवारीलाच फारूकी यांनी कार्यक्रम रहित केला. तरीही न्यायालयाकडे ‘फारुकी यांना यापुढे कधीही कार्यक्रम करण्यासाठी अनुमती देण्यात येऊ नये’, अशी मागणी करण्यात आली.
Success of Hindu Unity !
Due to Hindus protests, anti-Hindu ‘comic’ Munawar Faruqui’s shows in Hyderabad & Pune have been cancelled !
Hindus should continue to protest with unity against such Anti-Hindu comedians ✊ pic.twitter.com/c6yJol4UjP
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) January 8, 2022