भारतमाता आणि भूमाता यांच्या विरोधात अवमानकारक विधाने करणार्‍या पाद्य्रावरील गुन्हा रहित करण्यास मद्रास उच्च न्यायालयाचा नकार

अशा प्रकारचा निर्णय देणर्‍या मद्रास उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! ‘न्यायालयाने पुढे अशा आरोपींना दोषी ठरवून कठोरातील कठोर शिक्षा दिल्यास अन्य लोकांवर याचा वचक बसेल’, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक

चेन्नई (तमिळनाडू) – ‘भारतमाता’ आणि ‘भूमाता’ यांच्या विरेधात अवमानकारक विधाने करणारे पाद्री जॉर्ज पोन्नैया यांच्यावर नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित करण्यास मद्रास उच्च न्यायालयाने नकार दिला. पोन्नैया यांच्यावर कलम २९५ अ (धार्मिक भावना दुखावणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १८ जुलै २०२१ या दिवशी त्यांनी कन्याकुमारी येथील कार्यक्रमात अवमानजनक विधाने केली होती.

न्यायमूर्ती जी.आर्. स्वामीनाथन् सुनावणीच्या वेळी म्हटले, ‘भूमातेचा सन्मान करण्यासाठी पादत्राणे न घालता चालणार्‍यांची पोन्नैया यांनी थट्टा केली आहे. पोन्नैया यांनी भूमाता आणि भारतमाता यांचा ‘महामारी आणि अस्वच्छता यांचा स्रोत’, म्हणून उल्लेख केला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी याहून अधिक अवमानकारक काही असू शकत नाही. भारतमातेशी हिंदूंच्या भावना जोडलेल्या आहेत. ती अनेक हिंदूंसाठी देवता आहे. कुणालाही कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार नाही. पोन्नैया यांचे लक्ष्य हिंदू होते. ते हिंदूंना वेगळे, तर मुसलमान अन् ख्रिस्ती यांना वेगळ्या दृष्टीने पहातात.

पोन्नैया यांनी काय म्हटले होते ?

पोन्नैया यांनी नागरकोली येथील भाजपचे आमदार एम्.आर्. गांधी यांच्यावर टीका करतांना म्हटले, ‘भारतमातेला त्रास देण्याची इच्छा नसल्यामुळे गांधी पादत्राणे  घालत नाहीत. ‘आमचे पाय अस्वच्छ होऊ नयेत आणि भारतमातेमुळे आम्हाला कोणताही आजार होऊ नये, यासाठी आम्ही (ख्रिस्ती) पादत्राणे घालतो.