शंखवाळ-(सांकवाळ) गोवा, येथील पुरातन श्री विजयदुर्गा मंदिराच्या स्थानाचे रक्षण व्हावे !
‘शंखावली तीर्थक्षेत्र समिती’कडून जिल्हाधिकार्यांना निवेदन
हिंदूंच्या देशात हिंदूंना अशी मागणी करावी लागणे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
सांकवाळ (गोवा) ७ जानेवारी (वार्ता.) – शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळाला ‘पुरातन विजयादुर्गा मंदिर’ असे नाव द्यावे आणि ‘द फ्रंटीस पीस ऑफ चर्च’ हे अनधिकृत नाव पालटावे, अशी मागणी करत ४ जानेवारी २०२२ या दिवशी ‘शंखावली तीर्थक्षेत्र रक्षा समिती’ ने पुरातत्व विभागाच्या पणजी येथील कार्यालयासमोर धरणे धरले होते.
त्यानंतर या समितीने शुक्रवार ७ जानेवारी २०२२ या दिवशी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांना यासंबंधी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पुरातन विजयादुर्गा मंदिराच्या स्थळाचे रक्षण करण्यासाठी शंखावली तीर्थक्षेत्र रक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. या वारसास्थळावर अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत, तसेच या स्थळावर असलेले मंदिराचे अवशेष नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या स्थळावर असलेला पवित्र वटवृक्ष कापण्यात आला आहे. यासंबंधी अनेक हिंदूंनी वैयक्तिकरित्या तक्रारी करूनही यासंबंधी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, म्हणून आम्ही ही समिती स्थापन केली आहे.
हे वारसास्थळ हे पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असले, तरी सांकवाळ येथील फादर लुईस आल्वारीस आणि इतर काही ख्रिस्ती यांनी चर्चच्या नावाखाली या स्थळावर अतिक्रमण केले आहे. वर्ष २०१८ पासून या स्थळावर त्यांनी फेस्त (ख्रिस्त्यांची जत्रा) साजरे करण्यास प्रारंभ केला, तसेच ही जागा स्वच्छ करतांना येथील विजयादुर्गा मंदिराचे अवशेष ते नष्ट करत आहेत. या ठिकाणी त्यांनी अनधिकृतपणे एक शेड बांधली आहे. त्याशिवाय त्यांनी या जागेवर अनधिकृतपणे काळे क्रॉस उभारले आहेत. अनधिकृतपणे या जागेच्या फाटकाला टाळे ठोकले आहे. आश्चर्य म्हणजे या स्थळाचे रक्षण करण्यासाठी कोणतेही आदेश नसतांना अनधिकृतपणे पोलीस ठेवले आहेत.
वर्ष २०१८ पासून त्यांनी या जागेचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणारे डॉ. कालिदास वायंगणकर आणि त्यांचे कुटुंबीय यांना तेथून हुसकावून लावून अनधिकृतपणे या जागेचा वापर करता यावा यासाठी डॉ. कालिदास वायंगणकर आणि त्यांच्या कुटुंबियांवर आक्रमणे करायला प्रारंभ केला. त्यानंतर आता २ जानेवारी २०२२ या दिवशी ८० ते १०० ख्रित्यांनी डॉ. कालिदास वायंगणकर यांच्यावर आक्रमण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर समितीचे कार्यकर्ते त्या स्थळावर गेल्यावर १०० ते २०० ख्रिस्त्यांनी त्या ठिकाणी येऊन समितीच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. आम्ही पोलिसांकडे याविषयी तक्रार केल्यावर त्या ख्रिस्त्यांना कह्यात घेण्याऐवजी आम्हालाच वेर्णा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आम्ही या ख्रिस्त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करूनही पोलिसांनी प्रथमदर्शनी अहवाल नोंद केला नाही. त्याचप्रमाणे ‘डॉ. कालिदास वायंगणकर यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला’, अशी तक्रार केल्यावरही प्रथमदर्शनी अहवाल नोंदवण्यात आली नाही. पोलीस ठाण्यातून आम्ही परत त्या स्थळी आल्यावर आमच्या वाहनांची मोडतोड करण्यात आल्याचे आढळले. हे सर्व अनधिकृत प्रकार बंद होण्यासाठी आपण आवश्यक ती पावले उचलून कारवाई करावी.
हे निवेदन दिल्यानंतर शंखावली तीर्थक्षेत्र रक्षा समितीचे श्री. जयेश नाईक म्हणाले, ‘‘आम्ही जिल्हाधिकार्यांना हे निवेदन दिल्यानंतर त्यांनी आमचे म्हणणे नीट ऐकून घेतले आणि वास्को येथील उपजिल्हाधिकार्यांची भेट घेण्यास सांगितले. जिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘‘मी स्वतः त्यांना याविषयी सूचना देते. सांकवाळ स्थळाविषयीचा जो अहवाल आहे, तो पाहून मी काय करायचे ते ठरवते.’’
♦ हे पण वाचा –
शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या स्थानाचे रक्षण करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या पणजी येथील कार्यालयासमोर हिंदूचे धरणे
https://sanatanprabhat.org/marathi/541577.html
हा लढा आम्ही चालू ठेवणार आहोत आणि याविषयी न्याय मागणार आहोत. हिंदूंच्या भावनांचा कुणीही अंत पाहू नये. आम्ही ख्रिस्ती संत वगैरे यांनाही मानतो; परंतु विजयादुर्गा मातेच्या जागेवर होणारे अतिक्रमण सहन करणार नाही.
Hindu-Christian tension at Sancoale due to feast.
Watch: https://t.co/Jsh9w0VK9Q#Goa #GoaNews #Sancoale #Feast #Hindu #Christian pic.twitter.com/5yvatj0EDY— In Goa 24×7 (@InGoa24x7) January 8, 2022
निवेदनात आम्ही खालीलप्रमाणे मागण्या केल्या आहेत,
१. डॉ. कालिदास वायंगणकर यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्यांना कह्यात घेऊन त्यांच्यावर प्रथमदर्शनी अहवाल नोंद करावा.
२. आमचे कार्यकर्ते त्या स्थळावर गेल्यावर आम्हाला त्या ठिकाणी धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न करणार्यांना अटक करावी.
३. या स्थळावर लावलेल्या फलकावरील ‘फ्रंटीस पीस ऑफ चर्च’ या वाक्यातील चर्च हा शब्द काढून टाकून ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे नाव लिहावे.
४. या ठिकाणी उभारलेली अनधिकृत शेड काढून टाकावी.
५. या ठिकाणी साजरे करण्यात येणारे फेस्त (ख्रिस्त्यांची जत्रा) त्यांच्या मूळ स्थळी साजरे करावे.
६. या स्थळावर होणारी गोमांस आणि डुकराचे मांस यांची विक्री बंद करावी.