ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने

भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे रूपेश पुण्यार्थी, धर्मप्रेमी अशोक म्याना आणि प्रभाकर बेत्ती

ठाणे – नववर्षारंभाच्या नावाखाली गडकोट, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक अन् सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धुम्रपान, पार्ट्या करतांना होणारे अपप्रकार रोखले जावेत, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींसह विविध धर्मप्रेमींच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, शहापूर, वाशिंद येथे प्रशासनाला ११ ठिकाणी, तसेच ठाणे जिल्ह्यात एकूण ९ पोलीस ठाण्यांमध्ये निवेदने देण्यात आली. याच आशयाची निवेदने ठाणे जिल्ह्यातील एकूण ४० शाळा, ६ महाविद्यालये आणि ४० शिकवण्यांमध्येही (क्लासेस) देण्यात आली.

ठाणे येथील ब्राह्मण विद्यालय येथे प्रबोधन करतांना समितीचे कार्यकर्ते

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी व्याख्याने घेऊन आणि साप्ताहिक धर्मशिक्षणवर्गांतूनही याविषयी प्रबोधन करण्यात आले, तसेच फलक प्रसिद्धी, सामाजिक माध्यमांद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.