मुंबईतील रेल्वेस्थानकांवर बाँबस्फोटाची धमकी
मुंबई – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला या रेल्वेस्थानकांवर बाँबस्फोट करण्याची धमकी निनावी फोनद्वारे मिळाल्याने ७ जानेवारी या दिवशी येथे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या स्थानकांची सुरक्षा वाढवून ५ घंटे शोध घेण्यात आला; मात्र शेवटी काहीही संशयास्पद आढळून आले नाही. जबलपूर येथून हा फोन करण्यात आल्याचे उघड झाले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.