पू. भाऊकाका सांगती गीतेचे ज्ञान सकलांस ।
पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांच्याविषयी कु. प्रियांका माकणीकर यांनी केलेली कविता पुढे दिली आहे.
ओळखूनी गीतेचे मर्म ।
केले त्यांनी कर्म ।। १ ।।
ज्ञानाची महती जाणून ।
आचरिले त्यांनी जीवन ।। २ ।।
गीतेच्या ज्ञानाचा
जाणूनी शुद्ध अर्थ ।
जनमानसांत ज्ञान
रुजवती सार्थ ।। ३ ।।
केले त्यांनी अहर्निश यत्न ।
अजूनही करती ते ज्ञानार्जनाचा प्रयत्न ।। ४ ।।
ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग, कर्ममार्ग आदींचा करूनी सखोल अभ्यास ।
सांगती गीतेचे ज्ञान सकलांस ।। ५ ।।
आमचे भाग्य थोर; म्हणून लाभला तुमचा सहवास ।
आम्हासही लागो तुमच्यासम मुमुक्षुत्वाचा ध्यास ।। ६ ।।
– कु. प्रियांका माकणीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.८.२०२१)