उतारवयातही तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करणारे कोल्हापूर येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्रीकांत दिवाण (वय ६९ वर्षे) अन् ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. विद्या श्रीकांत दिवाण (वय ६४ वर्षे) !

श्री. श्रीकांत दिवाण
सौ. विद्या श्रीकांत दिवाण

१. श्री. श्रीकांत दिवाण यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१ अ. ‘दिवाणकाकांचा तोंडवळा तेजस्वी दिसतो. त्यांच्याकडे पाहिल्यावर पुष्कळ चांगले वाटते.’ – सौ. सुरेखा काकडे, कोल्हापूर

१ आ. आज्ञापालन करणे : ‘माझे यजमान दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन करतात. ते दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सूत्रांचे तंतोतंत पालन करतात.’ – सौ. विद्या श्रीकांत दिवाण (पत्नी), कोल्हापूर

१ इ. जवळीक साधणे : ‘त्यांनी समाजातील अनेक व्यक्तींशी जवळीक साधली आहे. त्यांनी वाचकांना साधना सांगून संस्थेशी जोडून ठेवले आहे.’ – सौ. विजया वेसणेकर, कोल्हापूर

१ ई. सेवेची तळमळ

१ ई १. रुग्णाईत वाचकांना सात्त्विक उत्पादने दुपारच्या कडकडीत उन्हात चालत जाऊन देणे : ‘एकदा भर दुपारी काका सात्त्विक उत्पादने घेण्यासाठी आमच्या घरी आले. तेव्हा त्यांचे दुपारचे जेवण अजून झाले नव्हते. ते चालून आल्यामुळे थोडे थकलेही होते. त्यांनी सांगितले, ‘‘एका रुग्णाइत वाचकाला आध्यात्मिक लाभ व्हावा, यासाठी सात्त्विक उत्पादने हवी आहेत.’’

– सौ. अंजली कोटगी, कोल्हापूर

१ ई २. अधिक वेळ खाली बसायला त्रास होत असूनही २ घंटे खाली बसून भावपूर्ण मंत्रपठण करणे : एप्रिल २०१९ मध्ये सेवाकेंद्रात गायत्री मंत्राचे पठण करायला सांगितले होते. काकांना अधिक वेळ खाली बसता येत नाही, तरी त्या दिवशी काकांनी २ घंटे खाली बसून भावपूर्णरित्या मंत्रपठण केले.’

– सौ. अंजली कोटगी

१ उ. श्रद्धा : काकांची कुलदेवता आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्यावर नितांत श्रद्धा आहे.’

– सौ. सुरेखा काकडे

१ ऊ. जाणवलेला पालट : ‘पूर्वी यजमानांचा स्वभाव पुष्कळ रागीट होता. ते ८ वर्षांपासून साधनेत आहेत. आता ते शांत झाले आहेत.’ – सौ. विद्या श्रीकांत दिवाण

२. सौ. विद्या दिवाण यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. तळमळीने सेवा करणे 

२ अ १. शारीरिक अडचणींवर मात करून विविध सेवा करणे : ‘काकूंना अनेक शारीरिक अडचणी असूनही त्या तळमळीने सेवा करतात. त्या ‘सनातन प्रभात’ नियतकालिके आणि सात्त्विक उत्पादने यांचे वितरण करतात. त्या शाळांमध्ये जाऊन निवेदने देतात. त्या सर्व सेवा भावपूर्णरित्या करतात.

२ आ. श्रद्धा 

१. ‘काकूंची परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्यावर श्रद्धा आहे. त्यामुळे ‘त्या रुग्णाईत असूनही स्थिर आणि सकारात्मक असतात’, असे लक्षात आले.’ – सौ. विजया वेसणेकर

३. श्री. श्रीकांत दिवाण आणि सौ. विद्या दिवाण यांचा सेवाभाव

श्री गणेश उत्सवात गणपतीच्या मूर्तींच्या विसजर्नाच्या वेळी साधक घाटावर सेवेसाठी जातात. त्या वेळी काका आणि काकू साधकांसाठी चहा, अल्पाहार आणि रात्रीचा महाप्रसाद बनवण्याची सेवा करतात. कितीही साधक असले, तरी ते दोघेही महाप्रसाद बनवण्याची सेवा आनंदाने करतात.’

– सौ. अंजली कोटगी

(सर्व सूत्रांचा दिनांक ६.७.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक