लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देणार्याला अटक
मुंबई – धारावीमध्ये कोरोनावरील लस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र देणार्या सेकारन फ्रान्सिस नाडर याला पोलिसांनी अटक केली आहे. इतकेच नव्हे, तर या बनावट प्रमाणपत्राची नोंदणी ‘कोविन ॲप’वरसुद्धा करण्यात आल्याने पोलीस आश्चर्यचकीत झाले आहेत. नाडर याचे सायबर कॅफेचे दुकान असून तो १ सहस्र रुपयांमध्ये हे प्रमाणपत्र देत होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्याकडे पाठवलेला ग्राहक मुंबईत असतांनाही त्याला बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र त्याने दिले.