कझाकिस्तानात तेल दरवाढीनंतर झालेल्या हिंसाचारामुळे सरकारचे त्यागपत्र
१९ जानेवारीपर्यंत आणीबाणी लागू
अल्माटी (कझाकिस्तान) – येथील केंद्र सरकारने तेलाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशात झालेल्या हिंसाराचानंतर सरकारने त्यागपत्र दिले. सरकारने पेट्रोलियम पदार्थ, घरगुती गॅस आणि गॅसोलिन यांच्या दरात वाढ केली होती. त्याच्या विरोधात देशभरात निदर्शने आणि हिंसाचार झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार आणि अश्रूधुराचा वापर केला. हिंसाचारात १०० वर सैनिक घायाळ झाले. सरकारने त्यागपत्र दिल्यानंतर देशात १९ जानेवारीपर्यंत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आर्थिक राजधानी अल्माटी आणि मंगिस्टाऊ प्रांत येथे रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू रहाणार आहे.