उत्तराखंडचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या सभेत चाकू घेऊन आलेल्या तरुणाला पकडले !
नवी देहली – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत काशीपूर येथील एका सभेत उपस्थित असतांना एक तरुण चाकू घेऊन थेट मंचावर पोचल्याची घटना घडली. या वेळी मंचावर उपस्थित असणार्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवत या तरुणाला पकडून त्याच्याकडून चाकू खेचून घेतल्यामुळे मोठी घटना टळली. हा तरुण मंचावर पोचल्यावर प्रथम त्याने ध्वनीक्षेपकावरून ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी या तरुणाला रोखल्यावर त्याने त्याच्याकडील चाकू बाहेर काढला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
उत्तराखंड के पूर्व मुख्यमंत्री हरीश रावत की सुरक्षा में चूक का मामला #Uttarakhand #HarishRawat https://t.co/IEaaZ2Pbl1
— AajTak (@aajtak) January 7, 2022