इस्लामिक स्टेटच्या नियतकालिकातून भारतातील मुसलमानांना ‘बाबरी’ पुन्हा उभारण्याची चिथावणी !
इस्लामिक स्टेटच्या चिथावण्या
|
|
नवी देहली – इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेचे ऑनलाईन नियतकालिक ‘व्हॉईस ऑफ हिंद’च्या ताज्या अंकामध्ये भारतातील मुसलमानांना ‘बाबरी’ पुन्हा उभारण्यासाठी चिथावणी देण्यात आली आहे. ‘जर तुम्ही मुसलमान आहात, तर तुम्ही आतंकवादी असले पाहिजे आणि म्हणून तुम्ही ‘त्यांना’ (हिंदूंना) त्रास द्यायला हवा’, अशीही चिथावणी देण्यात आली आहे.
ISIS magazine asks Muslims to ‘take back Babri’, calls Hindus ‘filthy urine drinkers’ who learned civilised living from Muslimshttps://t.co/Uvwc48g3Ei
— OpIndia.com (@OpIndia_com) January 6, 2022
१. या नियतकालिकाच्या एका पानावर एका इमारतीवर भगवा झेंडा घेतलेल्या हिंदूंना दाखवण्यात आले आहे. यावर लिहिले आहे, ‘चांगल्या मुसलमानांनो, हिंदूंकडून बाबरी मशीद परत घ्या !’ ‘चांगला मुसलमान’ म्हणजे जो अल्लाच्या व्यतिरक्त अन्य कुणावरही विश्वास ठेवत नाही.
२. हिंदूंना शिक्षा करण्याविषयी यात चिथावणी देण्यात आली आहे. ‘हिंदूंच्या येणार्या पिढ्यांना लक्षात राहिल अशी शिक्षा द्या’, असे यात म्हटले आहे. भारतीय मुसलमानांना सरकारच्या विरोधात हिंसात्मक जिहाद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘स्वतःचा बचाव करण्यापेक्षा आक्रमण हाच सर्वश्रेष्ठ बचाव आहे’, असेही यात म्हटले आहे.
३. या नियतकालिकाच्या मागील अंकामध्ये कर्नाटकातील मुरुडेश्वर येथील भगवान शिवाची मूर्ती दाखवून तिची तोडफोड केल्याचे चित्र बनवण्यात आले होते. या मूर्तीच्या डोक्यावर इस्लामिक स्टेटचा झेंडा दाखवण्यात आला होता. त्याद्वारे हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती तोडण्याची धमकी देण्यात आली होती.