सातारा जिल्ह्यात घरफोडींचे सत्र चालू !
एकाच रात्रीत फोडली ५ घरे
सातारा, ६ जानेवारी (वार्ता.) – खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे एका घरावर ५ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत घरातील २ सदस्यांना मारहाण केली आहे. या घरातून १ लाख ३० सहस्र रुपये रोख आणि १३ तोळे सोन्याचा ऐवज पळवण्यात आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात प्रविष्ट झाली आहे, तर दुसरीकडे पाटण तालुक्यातील विहे या गावात दरोडेखोरांनी ४ घरे फोडून १ किलो चांदीचे दागिने आणि रोख १४ सहस्र रुपये पळवून नेल्याची तक्रार ग्रामस्थांनी पोलिसात दिली आहे. (पुसेसावळी येथील सशस्त्र दरोडा आणि विहे येथे दरोडेखोरांनी एकाच रात्रीत ४ घरे फोडल्यामुळे सातारा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरोडेखोरांपासून पोलीस सामान्य जनतेचे रक्षण करू शकत नाहीत, हे चिंताजनक आहे. काळाची आवश्यकता लक्षात घेऊन सामान्य जनतेने लकरात लवकर स्वरक्षणासाठी सिद्ध व्हावे. – संपादक)