पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार ! – विरोधकांचा आरोप

(डावीकडे) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (उजवीकडे) जमियत-ए-उलेमा-ए-इस्लामचे प्रमुख फजलुर रहमान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाने परदेशी नागरिक आणि आस्थापने यांच्याकडून मिळालेल्या पक्ष निधीची संपूर्ण माहिती देशाच्या निवडणूक आयोगाला दिली नाही. पक्षाच्या बँक खात्याशी संबंधित माहितीदेखील निवडणूक आयोगापासून लपवून ठेवण्यात आली. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने संकलित केलेल्या अहवालाच्या आधारे स्थानिक प्रसारमाध्यमांनी हा दावा केला आहे.

जमियत-ए-उलेमा-ए-इस्लामचे प्रमुख फजलुर रहमान यांनी या सूत्रावरून इम्रान खान यांच्या पक्षावर टीका करतांना म्हटले की, जर सर्व पाकिस्तानी राजकारण्यांच्या चुकीच्या कृत्यांची गणना केली, तरी त्यांची तुलना पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या भ्रष्टाचाराशी होऊ शकत नाही. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ हा चोरांचा पक्ष आहे. राजकारणात शिवीगाळ करण्याची संस्कृती आणणारा हा एकमेव पक्ष आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी निवडणूक आयोगापासून ५३ बँक खात्यांची माहिती लपवली आहे.