वारजे माळवाडी (पुणे) येथील काळूबाई मंदिरात चोरी !
हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! हिंदूबहुल देशात हिंदूंच्या मंदिरांत चोर्या होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक
पुणे – येथील वारजे माळवाडी परिसरातील अखिल विठ्ठलनगर नवरात्र उत्सव यांच्या मालकीच्या काळूबाई मंदिरातील दरवाज्याचे कुलूप उचकटून देवीचा चांदीचा मुखवटा, १ सोन्याचे मंगळसूत्र आणि २ दानपेटींतील रक्कम ४ जानेवारीच्या पहाटे चोरांनी चोरून नेली. दानपेटीमध्ये किती रक्कम होती, हे समजू शकले नाही. या प्रकरणी कमलाकर गलांडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार वारजे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.