रायगडावरील अवैध बांधकाम आणि रंगरंगोटी तात्काळ हटवून नवीन बांधकामास पायबंद घालावा !
खासदार संभाजीराजे यांची पुरातत्व विभागाकडे पत्राद्वारे मागणी
|
पनवेल – किल्ले रायगडावरील ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी काही दिवसांपूर्वी काहींनी रंगरंगोटी करून त्यावर चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे शिवप्रेमींनी निदर्शनास आणून दिले आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असतांना रायगडासारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे आहे. किल्ले रायगडचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहावे यासाठी या ठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम अथवा रचना करण्यास तात्काळ पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी करून संभाजीराजे यांनी या प्रकरणी आक्षेप नोंदवला आहे.
दुर्गराज रायगडावरील ‘मदार मोर्चा’ येथे घडत असलेल्या प्रकाराबद्दल पुरातत्व विभागास पत्र दिले…. pic.twitter.com/NzawVC4uOV
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 6, 2022
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई विभागाचे अधीक्षक, तसेच नवी देहलीमधील भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना त्यांनी हे पत्र पाठवले आहे.
दुर्गराज रायगड वरील मदार मोर्चा येथील प्रकाराची दखल घेत आज सकाळीच पुरातत्त्व विभागास पत्र लिहून केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालिका विद्यावती जी व मुंबई विभागाचे अधीक्षक पुरात्वशास्त्रज्ञ राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधून तात्काळ याविषयी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत… pic.twitter.com/w2RAeBHKqM
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 6, 2022
काही शिवप्रेमींनी त्यांना रायगडावरील मदार मोर्चा येथे काही दगडांना रंग देऊन, तिथे हिरवा झेंडा लावल्याचे आणि त्यांवर चादर टाकल्याचे, तसेच तिथे मुसलमान जात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.