(म्हणे) ‘सनातन धर्म नष्ट झालाच पाहिजे !’
तमिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के.एस्. अलागिरी यांची हिंदुद्वेषी विधान !
|
चेन्नई (तमिळनाडू) – भाजपचा पराभव झाला पाहिजे. सनातन धर्म नष्ट झाला पाहिजे. काँग्रेस आघाडीचा मुख्य उद्देश सनातन धर्म नष्ट करणे हा आहे. त्यासाठी काँग्रेसने टिकून राहिले पाहिजे, असे विधान तमिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के.एस्. अलागिरी यांनी ‘चाणक्या टीव्ही’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. तमिळनाडूतील काँग्रेसने व्हिसीके (विदुथलाई चिरुथाईगल कत्ची – स्वतंत्र (लिबरेशन) पँथर पक्ष) या मित्र पक्षासमवेत युती केली आहे. त्यावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी हे उत्तर दिले.
‘Anti-BJP parties believe that Sanatana Dharma should be destroyed’: TN Congress chief KS Alagiri endorses Hinduphobic comments of MP Thol Thirumavalavanhttps://t.co/aRJgeVaoXL
— OpIndia.com (@OpIndia_com) January 1, 2022
याआधी म्हणजे २८ डिसेंबर २०२१ या दिवशी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या समारंभात उपस्थितांना संबोधित करताना अलागिरी यांनी ‘धर्मनिरपेक्षता हे काँग्रेसचे धोरण आहे जे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. काँग्रेस हिंदु धर्माच्या विरोधात नाही’, असे विधान केले होते. (काँग्रेसची धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदुद्वेष आहे, हे आता हिंदूंनी जाणले आहे. त्यामुळेच हा पक्ष आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे ! – संपादक)
वर्ष २०१९ मध्ये व्हिसीके पक्षाचे प्रमुख आणि खासदार थिरुमावलावन यांनी ‘राष्ट्र वाचवा, सनातन धर्माचा नायनाट करा’ या परिषदेचे आयोजन केले होते. व्हिसीके हा द्रमुक आणि काँग्रेस यांचा मित्रपक्ष आहे. या परिषदेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी भाग घेतला होता.