शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या स्थानाचे रक्षण करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या पणजी येथील कार्यालयासमोर हिंदूचे धरणे

हिंदूंच्या देशात हिंदूंना अशी मागणी करावी लागणे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

सांकवाळ तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा माता

सांकवाळ, (गोवा) ५ जानेवारी (वार्ता.) – शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळाला ‘पुरातन विजयादुर्गा मंदिर’ असे नाव द्यावे आणि ‘द फ्रंटीस पीस ऑफ चर्च’ हे अनधिकृत नाव पालटावे, अशी मागणी करत ५ जानेवारीला ‘शंखावली तीर्थक्षेत्र रक्षा समिती’च्या नेतृत्वाखाली हिंदूंनी पुरातत्व विभागाच्या पणजी येथील कार्यालयासमोर धरणे धरले. या वेळी समितीचे श्री. जयेश नाईक म्हणाले, ‘‘या विभागाच्या प्रतिनिधीकडे आम्ही आमच्या मागण्या मांडल्या आहेत. आमच्या मागण्यांनुसार या वारसास्थळी अनधिकृत नाव असलेला फलक काढून टाकून त्या जागी अधिकृत नाव असलेला फलक लावला पाहिजे.

पुरातत्व विभागाच्या पणजी येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतांना ‘शंखावली तीर्थक्षेत्र रक्षा समिती’ कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ

तेथे असलेले अनधिकृत बांधकाम काढून टाकावे, तसेच वारसास्थळी साजरा करण्यात येणारे फेस्त (ख्रिस्त्यांची जत्रा) त्यांच्या मूळ जागी साजरी करावी. सर्व लोकांना तेथे जाता यावे, यासाठी या जागेवरधर्मांध ख्रिस्ती असलेले फाटक उघडे करावे.


हे पण वाचा –

सांकवाळ तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी वारसास्थळी ख्रिस्त्यांकडून पुन्हा फेस्ताच्या आयोजनासाठी अनधिकृतपणे मंडपाची उभारणी
https://sanatanprabhat.org/marathi/537897.html


हे सर्व येत्या २४ घंट्यांत झाले पाहिजे. या वारसास्थळी गोमांस टाकणे वगैरे अनुचित प्रकार होता कामा नयेत आणि असे जर झाले, तर १६ जानेवारीला ज्या दिवशी फेस्त आहे त्याच दिवशी या ठिकाणी आम्ही विजयादुर्गादेवीची जत्रा भरवू.’’