कोरोनावरील ‘मोलनुपिरावीर’ गोळीला आपत्कालीन वापरास संमती !

नवी देहली – भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्यावर मात करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने ‘मोलनुपिरावीर’ गोळीला आपत्कालीन वापरास संमती देण्यात आली आहे. मोलनुपिरावीर व्यक्तिरिक्त ‘कोवोवॅक्स’ आणि ‘कॉर्बेवॅक्स’ या २ गोळ्यांनाही संमती दिली आहे.

१. मोलनुपिराविर या गोळीचा वापर कोरोना संक्रमित रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात येतो. ही गोळी विषाणूला शरिरात पसरण्यापासून रोखते आणि लवकर बरे होण्यास साहाय्य होते.

२. कोरोना झालेल्या रुग्णांना १२ घंट्यांमध्ये मोलनुपिराविरच्या ४ गोळ्या घ्याव्या लागतात. त्यामुळे पुढे ५ दिवस याच्या नियमित ४ गोळ्या घेणे आवश्यक आहे. ५ दिवसांसाठीच्या संपूर्ण गोळ्यांची किंमत १ सहस्र ३९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

३. लवकरच देशातील सर्व वैद्यकीय दुकानांमध्ये (मेडिकलमध्ये) मोलनुपिराविर सहजरित्या मिळणार आहे. ज्या रुग्णांना कोरोना झाला आहे, तसेच ज्यांची प्रकृती ढासळली असेल, अशा रुग्णांनाच मोलनुपिराविरची गोळी देण्यास अनुमती देण्यात आली आहे. गोळीची खरेदी करतांना डॉक्टरांकडून लिहून आणलेल्या चिठ्ठीद्वारेच खरेदी करता येणार आहे.