परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भावपूर्ण प्रार्थना करतांना आलेली अनुभूती
१. आध्यात्मिक प्रगती न झाल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आनंद देऊ शकत नसल्याविषयी खंत वाटणे
‘साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आनंद सामावला आहे’, हे वाक्य आपण अनेक वेळा ऐकतो. ‘आमची प्रगती व्हावी’; म्हणून आम्ही कुटुंबीय मनापासून प्रयत्न करत असतो. असे असूनही ‘आम्हा कुटुंबियांपैकी कुणाचीही आध्यात्मिक पातळी ६० टक्के किंवा त्याहून अधिक झालेली नसल्याने आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांना आनंद देऊ शकत नाही’, असे वाटून आमचे मन खिन्न होते.
२. प्रार्थनेच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख करतांना कंठ दाटून येणे
एकदा मी नामजप करत असतांना ‘उच्च आध्यात्मिक पातळी गाठण्याव्यतिरिक्त परात्पर गुरु डॉक्टरांना आनंद देऊ शकू, असे आपण काही करू शकणार का ?’, असा विचार माझ्या मनात येत होता. नामजपानंतर मी ‘परात्पर गुरु डॉक्टरांवर आलेला महामृत्यूयोग टळू दे, तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभू दे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहू दे’, अशी प्रार्थना करत होतो. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांचा उल्लेख करतांना माझा कंठ दाटून आला. त्या दिवसापासून माझ्याकडून ही प्रार्थना अतिशय भावपूर्णरित्या होऊ लागली.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या कार्यातील गोवर्धनरूपी पर्वताला आमच्या भावपूर्ण प्रार्थनारूपी काठ्या लागणार असल्याने आनंद होणे
‘परात्पर गुरु डॉक्टरांसाठी आम्ही कुटुंबातील पाचही जण प्रार्थना करत आहोत’, याचा मला अभिमान वाटला. ‘भगवान श्रीकृष्ण ही प्रार्थना नक्कीच ऐकत असेल’, असे मला वाटले. त्याच वेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या कार्यातील गोवर्धनरूपी पर्वताला आम्हा कुटुंबियांच्या काठ्या लागणार आहेत’, असा माझ्या मनात विचार आला. तेव्हा ‘हेही नसे थोडके’, असे वाटून मला आनंद झाला.’
– श्री. प्रभाकर प्रभुदेसाई, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |