कर्नाटक : सरकारी महाविद्यालयात ‘हिजाब’ घालण्याची अनुमती; हिंदु विद्यार्थी गळ्यात भगवा रूमाल घालणार
‘हिजाब’ म्हणजे डोके झाकण्याचे कापड
बेंगळुरू (कर्नाटक) – कोप्पा जिल्ह्यातील बालागडी गावात असलेल्या सरकारी महाविद्यालयात मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब घालून बसण्याची अनुमती दिली जात असेल, तर हिंदु विद्यार्थ्यांनी गळ्यात भगवा रूमाल घालून बसवण्याला कोणतीही अडचण नसावी, असे सूत्र विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहे. ‘इंडिया टुडे’ नियतकालिकाने याविषयीचे वृत्त दिले आहे. काही विद्यार्थ्यांनी याआधी विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यास मनाई केली होती. आता या सूत्रावर पालक आणि विद्यार्थी यांच्यात चर्चा होणार आहे. ३ वर्षांपूर्वी हेच सूत्र उपस्थित झाले असता परिस्थिती हाताळण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने हस्तक्षेप केला होता.
#Karnataka: A section of college students in Koppa district wear saffron scarves protesting against allowing hijab inside classrooms#protest #students
(@nagarjund)https://t.co/e4CqFRM683— IndiaToday (@IndiaToday) January 5, 2022