गेली २ वर्षे अवैधरित्या भारतात रहाणार्या श्रीलंकेच्या धर्मांध नागरिकाला अटक
विदेशी नागरिक भारतात २ वर्षे अवैधरित्या रहातो, हे भारतीय गुप्तचर यंत्रणांना ठाऊक नाही कि त्या झोपलेल्या आहेत ? – संपादक
संभल (उत्तरप्रदेश) – येथील लोधी सराय भागामध्ये गेल्या २ वर्षांपासून अवैधरित्या रहाणार्या श्रीलंकेच्या अब्दुल कादीर महंमद नजीर या नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या २ वर्षांपासून त्याने व्हिसाचे (एखाद्या देशात काही कालावधीसाठी निवास करण्याची अनुमती) नूतनीकरण केले नव्हते. तसेच त्याने भारताचा नागरिक असल्याचे बनावट ओळखपत्रही बनवले होते. त्याच्या पत्नीने तो हिर्यांच्या तस्करीमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे.