बिकानेर (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर तलवारीने आक्रमण करून गोळीबार
जमावाकडून धर्मांधांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांधांना अधिक जोर येऊन ते हिंदूंवर आक्रमण करतात, यात आश्चर्य ते काय ? – संपादक
बिकानेर (राजस्थान) – येथील आंबेडकर सर्कल भागात दुकानावरून झालेल्या वादातून धर्मांधांनी तेजस्वी गेहलोत या व्यक्तीवर तलवारीने आक्रमण केले आणि नंतर पायावर गोळी मारली. या घटनेनंतर हिंदु जागरण मंचकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर धर्मांध आणि हिंदूंचा जमाव यांच्यात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. या वेळी पोलिसांकडून दोन्ही जमावांवर लाठीमार करण्यात आला, तर हिंदु जागरण मंचचे अध्यक्ष जेठानंद व्यास यांना पोलिसांनी कह्यात घेतले. (काँग्रेसच्या राज्यात आक्रमण धर्मांध करतात, तर कह्यात हिंदूंना घेतले जाते, हे लक्षात घ्या ! – संपादक) या वेळी मोठ्या प्रमाणात तणाव असल्याने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही धर्मांच्या प्रमुख लोकांना शांतता निर्माण करण्यासाठी बोलावले. (हिंदूंनी अशांतता निर्माण केलेली नाही, तर त्यांना कशाला बोलावले ? ज्यांनी अशांतता निर्माण केली, त्यांना अटक करून कारागृहात डांबले, तर आपोआपच शांतता निर्माण होणार आहे, हे पोलिसांना कसे कळत नाही कि ते अज्ञानी आहेत ? – संपादक)
Rajasthan: Violence in Bikaner after attack on youth over property dispute https://t.co/jyMdrbkI5V
— TOI Cities (@TOICitiesNews) January 5, 2022
भाजप नेत्याच्या ट्वीटला उत्तर देऊन पोलिसांनी घटनेला ‘क्षुल्लक’ ठरवले !
काँग्रेसच्या राज्यांत धर्मांधांकडून हिंदूंवर होणारी आक्रमणे ही ‘क्षुल्लक’च असणार, हे हिंदूंनी नेहमीच लक्षात ठेवावे आणि अशा पक्षाला राजकीयदृष्ट्या कायमचे संपवावे !
भाजपचे नेते लक्ष्मीकांत भारद्वाज यांनी या घटनेचा एक व्हिडिओ ट्वीट करून म्हटलेे आहे की, तेजस्वी यांना साजिद, सद्दीक, फिरोज, इरफान, शाहरुख आणि सिकंदर यांनी घेराव घालून भर बाजारात गोळी मारली.
या ट्वीटला उत्तर देतांना बिकानेर पोलिसांनी ‘दुकान रिकामे करण्यावरून दोन गटांमध्ये वाद आहे. याविषयी खटलाही चालू आहे. याच संदर्भात एका पक्षाकडून बाजार बंद करतांना दगडफेकीची घटना घडली. ती क्षुल्लक होती. आता तेथे शांतता आहे आणि चर्चा चालू आहे.