हिंदूंच्या धर्मसंसदेत सैन्य, पोलीस आणि नागरिक यांना अल्पसंख्यांकांची हत्या करण्यास सांगितले जात असल्याचा हिंदुद्वेषी गीतकार जावेद अख्तर यांचा कांगावा !
|
मुंबई, ४ जानेवारी (वार्ता.) – धर्मांध मुसलमानांनी आतापर्यंत देशात अनेक आतंकवादी आक्रमणे करून सहस्रावधी हिंदूंच्या निर्घृण हत्या केल्याचा इतिहास असतांना हिंदुद्वेषी गीतकार जावेद अख्तर यांनी मात्र हिंदूंच्या कार्यक्रमात मुसलमानांना मारण्याची चिथावणी दिली जात असल्याचा कांगावा केला आहे. हरिद्वार येथे झालेल्या हिंदु संतांच्या धर्मसंसदेत जे वक्तव्य करण्यात आलेले नाही, त्याविषयी धादांत खोटे ‘ट्वीट’ करून जावेद यांनी हिंदूंनाच अतिरेकी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. हरिद्वार येथील धर्मसंसदेविषयी ‘सैन्य, पोलीस आणि नागरिक यांना अल्पसंख्यांकांची हत्या करण्यास सांगितले गेले’, असे खोटे ‘ट्वीट’ ३ जानेवारी या दिवशी जावेद यांनी केले.
There is an online auction of hundred women There are so called Dharm Sansads , advising the army the police n the people to go for the genocide of almost 200 MLN Indians .I am appalled with every one ‘s silence including my own n particularly of The PM . Is this Sub ka saath ?
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) January 3, 2022
त्यावर मोठ्या प्रमाणात जनतेने त्यांना ‘ट्रोल’ (‘ट्विटर’वर एखाद्याने पाठवलेल्या संदेशाला संदेशाच्या माध्यमातूनच विरोध करणे) केले. त्यानंतर संयम सुटलेल्या अख्तर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह समस्त हिंदूंनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला.
मुसलमान महिलांची छायाचित्रे प्रसारित करणार्या ‘ॲप’च्या प्रकरणाचा संबंध हरिद्वार येथील धर्मसंसदेशी लावून अख्तर यांनी त्यांच्या या ट्वीटमध्ये असेही म्हटले आहे, ‘एकीकडे शेकडो महिलांचा ‘ऑनलाईन’ लिलाव चालू आहे. दुसरीकडे तथाकथित धर्मसंसद भरत आहे. या सर्व प्रकरणावर माझ्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य सर्वांच्या मौनाची भीती वाटत आहे. हाच का ‘सब का साथ’ ?’
जावेद यांच्या या ‘ट्वीट’वर अनेकांनी टीका करत त्यांना धर्मांध ठरवले आहे. त्यामुळे संतापलेल्या अख्तर यांनी ४ जानेवारी या दिवशी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे,
The moment I raised my voice against the online auction of women n those glorifying Godse n preaching genocide to the army police n people some bigots have started abusing my great great grand father a freedom fighter who died in kala pani in 1864 What do you say to such idiots
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) January 4, 2022
‘ज्या क्षणी मी महिलांच्या ‘ऑनलाईन’ लिलाव प्रकरणावर भूमिका मांडली, गोडसे याचा उदोउदो करणार्यांना विरोध केला, एका विशिष्ट धर्माविरोधात नरसंहाराची शिकवण देणार्यांच्या विरोधात मत व्यक्त केले, त्या क्षणी काही धर्मांध व्यक्तींनी माझ्या खापर पणजोबांना शिवीगाळ करायला प्रारंभ केला. ते स्वातंत्र्यसेनानी होते. काळ्या पाण्याची शिक्षा भोगतांना वर्ष १८६४ मध्ये त्यांचे निधन झाले. अशा (ट्रोलर्स) मूर्खांना तुम्ही काय म्हणाल ?’ असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे. (धर्मांध ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवून हिंदु महिलांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत, त्याविषयी जावेद यांनी प्रथम स्वत:च्या समाजबांधवांना फटकारावे ! नागरिकांकडून धर्मांध म्हणून ‘ट्रोल’ झाल्यावर स्वतःची देशभक्ती दाखवण्यासाठी खापरपणजोबांचे उदाहरण देऊन सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे ढोंगी अख्तर ! – संपादक)