आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ७ जानेवारीला सुनावणी होणार !
मुंबई, ४ जानेवारी (वार्ता.) – शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या आक्रमणाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ४ जानेवारी या दिवशी पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती; मात्र राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडे २ दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे नितेश राणे यांची अटक तूर्तास टळली आहे. ‘प्रतिज्ञापत्र सादर होत नाही, तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करण्यात येणार नाही’, असे तोंडी आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जानेवारी या दिवशी होणार आहे. नितेश राणे १ आठवड्यापासून अज्ञातवासात आहेत.