नयन हंकारे आणि संतोष सावंत ‘ब्लॅक बेल्ट’चे मानकरी !
कोल्हापूर, ४ जानेवारी (वार्ता.) – नुकतीच जुन्नर येथे ‘ब्लॅक बेल्ट’ परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत कोल्हापूर ‘गेनसेई रियु कराटे दो असोसिएशन’ आणि ‘चाणक्य मार्शलआर्ट्स बहुउद्देशीय संस्थे’चे संतोष श्रावण सावंत याने ‘ब्लॅक बेल्ट शोदान’ आणि नयन प्रदीप हंकारे यांनी ‘ब्लॅक बेल्ट निदान’ या कराटेतील उच्च मानली जाणारी पदवी प्राप्त केली. नयन ही कराटेतील दुसरी पदवी प्राप्त करणारी कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली विद्यार्थीनी आहे. या परीक्षा ‘इंडियन गेनसेई रियु कराटे दो फेडरेशन’चे मुख्य प्रशिक्षक शिहान संदीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘सेन्साई’ राजेश गाडे सर यांच्या प्रशिक्षणाखाली घेण्यात आल्या. वरील विद्यार्थ्यांना ‘चाणक्य मार्शल आर्ट्स बहुउद्देशीय संस्थे’चे मुख्य प्रशिक्षक सेन्साई संदीप लाड यांचे प्रशिक्षण लाभले.