(म्हणे) ‘भगवान श्रीकृष्ण प्रतिदिन माझ्या स्वप्नात येऊन सांगतात की, उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष रामराज्य स्थापन करील !’
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा दावा !
|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भगवान श्रीकृष्ण प्रतिदिन रात्री माझ्या स्वप्नात येतात आणि सांगतात की, मी (अखिलेश यादव) राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीनंतर उत्तरप्रदेशमध्ये सरकार स्थापन करून रामराज्य स्थापन करीन, असे विधान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अन् राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले.
(सौजन्य : Jansatta)
भाजपच्या बहराईच येथील आमदार माधुरी वर्मा यांना समाजवादी पक्षात सहभागी करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘रामराज्याचा मार्ग हा समाजवादाच्या मार्गाने आहे. ज्या दिवशी ‘समाजवाद’ स्थापन होईल, त्याच दिवशी राज्यात रामराज्य स्थापन होईल,’ असेही अखिलेश यादव म्हणाले. (रामराज्याचा अर्थही ठाऊक नसणारे अखिलेश यादव म्हणतात ‘‘समाजवाद रामराज्य स्थापन करील !’’ – संपादक)